रॅपर 'बादशाह'च्या गाडीचा अपघातात चक्काचूर, थोडक्यात वाचले प्राण
रॅपर 'बादशाह'च्या गाडीचा अपघातात चक्काचूर, थोडक्यात वाचले प्राण
रस्त्यांच्या अपूर्ण बांधकामाचा फटका प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) याला बसला आहे. त्याच्या गाडीचा दिल्लीजवळ भीषण अपघात झाला. नेमकं काय घडलं वाचा सविस्तर
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : रस्त्यांच्या अपूर्ण बांधकामाचा फटका प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) याला बसला आहे. त्याच्या गाडीचा दिल्लीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बादशाह थोडक्यात बचावला आहे. सोमवारी पंजाबमधील सरहिंदमधून दिल्लीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. बांधकाम सुरू असलेल्या पुलावर तिथल्या कामगारांनी सिमेंटच्या काही स्लॅब ठेवल्या होत्या. त्यावर गाडी आदळल्याने हा अपघात झाला. राजपुरा-सरहिंद बायपासजवळ हे काम सुरू आहे. दाट धुक्यामुळे चालकाला पुढचं काही न दिसल्याने ही घटना घडली.
या घटनेमध्ये बादशाहच्या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तर थोड्यातच बादशाहचा जीव वाचला. अपघातादरम्यान गाडीतील एअर बॅगमुळे उघडल्यामुळे जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी कोणताही बोर्ड नव्हता, जेणेकरून समजेल की त्या मार्गावर काम सुरु आहे. धुक्यामुळे समोर काय आहे तेही दिसत नव्हतं. केवळ एअर बॅग असल्यामुळे बादशाहचे प्राण वाचले आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.