मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात लटकवलं पाहिजे'- कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य

'बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात लटकवलं पाहिजे'- कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य

कंगना रणौत (kangana ranaut) सध्या भोपाळमध्ये (Bhopal) असून ती तिच्या आगामी चित्रपट (Upcoming Movie) 'धाकड' (Dhaakad) च्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) केलं आहे.

पुढे वाचा ...

भोपाळ, 09 जानेवारी: बॉलीवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. तिने सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यूनंतर अनेक बॉलिवूडकरांवर टीकेची झोड उठवली होती. तसेच मुंबईला पीओके संबोधल्यानंतर कंगना रणौत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील शाब्दिक चकमक शिगेला पोहचली होती. आता कंगनाने आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. तिनं मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं आहे. यावेळी कंगना म्हणाली की, 'गॅंगरेप करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशी दिली पाहिजे.'

कंगना रणौत सध्या भोपाळमध्ये असून ती तिच्या आगामी चित्रपट 'धाकड' च्या शुटींगमध्ये व्यग्र आहे. यावेळी तिने घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील अल्पवयीन मुलींवर गॅंगरेप करणाऱ्या आरोपींना जोपर्यंत भर चौकात लटकवलं जात नाही, तोपर्यंत अत्याचार थांबणार नाहीत. त्याअनुषंगाने  कडक कारवाई करत भर 5-6 उदाहरणं समाजासमोर ठेवली पाहिजेत.

(हे वाचा-'कृष्णदासी'फेम अभिनेत्री पोलिसात, धर्मांतरणासाठी पती मारहाण करत असल्याचा आरोप)

सौदी अरबमधील कित्येक देशांत आजही बलात्कार करणाऱ्या आरोपीला भर चौकात लटकवलं जातं, याची आठवण करून देताना कंगनाने अशा कायद्यांची भारतालाही गरज असल्याचंही म्हटलं आहे. त्यासाठी भारतीय जुन्या कायद्यांत बदल करावा. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पीडितेवर असल्याने बऱ्याचदा आरोपी कायदेशीर कचाट्यातून सुटतो. त्यामुळे कायदे आणखी कडक करण्याची गरज असल्याचं तिने म्हटलं आहे.

'लव्ह जिहाद' कायद्याला दिलं समर्थन

सध्या उत्तरप्रदेश आणि कर्नाटक राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू केला आहे. या कायद्याला कंगना रणौतने आपलं समर्थन दिलं आहे. यावेळी ती म्हणाली की, ' लव्ह जिहाद कायदा चांगला आहे. हा कायदा केवळ त्यांच्यासाठी आहे, जे लव्ह जिहाद करतात. तसेच आंतरजातीय विवाहात धोका देणाऱ्या व्यक्तींसाठी हा कायदा असल्याचंही तिने म्हटलं आहे. सध्या कंगना आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी भोपाळमध्ये आहे. तिचा 'धाकड' नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Gang Rape, Kangana ranaut, Love jihad