VIDEO : विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग झालं व्हायरल

विक्रांत-ईशाचं लग्न झालं. त्यानंतर मायरानं एक रॅप साँग बनवलंय. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 03:58 PM IST

VIDEO : विक्रांत सरंजामे आणि मायराचं रॅप साँग झालं व्हायरल

मुंबई, 17 जानेवारी : विक्रांत सरंजामे आणि ईशाचं लग्न अगदी धूमधडाक्यात लागलं. भोर इथे शूटिंग सुरू होतं. हे लग्न अगदी राजेशाही पद्धतीनं झालं. कलाकारांनी अहोरात्र शूटिंग केलं.

थोडा विरंगुळा म्हणून मायराची भूमिका करणाऱ्या अभिज्ञा भावेनं एक गंमत केलीय. तिनं सुबोध भावे, गायत्री, झेंडे, विक्रांतचा भाऊ आणि वहिनी यांना घेऊन एक रॅप साँग बनवलंय. सध्या ते खूप व्हायरल होतंय. सुबोध भावेनंही आपल्या इन्स्टाग्रामवर ते शेअर केलंय.
Loading...

 

View this post on Instagram
 

तुला पाहते रे ची " Rap चिक " गॅंग @_gayatridatar_ @abhidnya.u.b @aashu.g @umesh_jagtap18 @dey_pu_ @zeemarathiofficial


A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

विक्रांत-ईशाच्या लग्नाला घेऊनच हे रॅपसाँग बनवलंय. त्यात एरवी गावरान भाषा बोलणारे झेंडेही एकदम स्टाइलिश वागतायत.

मध्यंतरी या शाही लग्नाबद्दल गार्गी फुले म्हणजेच ईशाची आई म्हणाली होती, आम्ही कलाकार म्हणून सगळं एंजाॅय तर केलंच. पण आमच्याच मुलीचं लग्न होतंय, असं फीलिंग होतं.

सरंजामेंची लग्नपत्रिकाही खासच होती. ती दाखवायचं काम सोपवलं होतं मायरावर. आॅफिसमध्ये सगळ्यांना काॅन्फरन्स हाॅलमध्ये बोलवून मायरानं ती पत्रिका दाखवली. आमंत्रण पत्रिका खासच होती. त्यात एक छोटासा गणपती बाप्पाही होता. शुभकार्याला आशीर्वाद द्यायला. याशिवाय या पत्रिकेत चांदीचा कुंकवाचा करंडा, मोती अशा गोष्टीही होत्या.

या पत्रिकेची किंमत काय, हा प्रश्न ईशाच्या वडिलांनी मायराला विचारला. त्याचं उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. ते म्हणजे याची किंमत होती दीड लाख रुपये.


#TRPमीटर : शनायाच्या लग्नापेक्षा विक्रांत सरंजामेचं लग्न पडलं भारी, टीआरपीत वर्षातला सर्वात मोठा बदल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...