मी 200 टक्के सिनेमाच्या टीमसोबत आहे - रणवीर सिंग

मी 200 टक्के सिनेमाच्या टीमसोबत आहे - रणवीर सिंग

अखेर रणवीर सिंग पद्मावतीबद्दल बोलला. एका ब्रॅण्डच्या प्रसिद्धीसाठी आज रणवीर सिंगने मुंबईत हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार त्याला सहज जाऊ देतील थोडेच! पत्रकारांनी त्याला एकच गराडा घातला आणि पद्मावती चित्रपटावरील वादासंदर्भात विचारलं.

  • Share this:

22 नोव्हेंबर : अखेर रणवीर सिंग पद्मावतीबद्दल बोलला. एका ब्रॅण्डच्या प्रसिद्धीसाठी आज रणवीर सिंगने मुंबईत हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार त्याला सहज जाऊ देतील थोडेच! पत्रकारांनी त्याला एकच गराडा घातला आणि पद्मावती चित्रपटावरील वादासंदर्भात विचारलं.

खरं तर रणवीर सिंग सविस्तर काही बोलेल, असं वाटलं होतं. पण तो मोजकच बोलला. तो म्हणाला, 'मी 200 टक्के सिनेमाच्या टीमसोबत आहे आणि आत्ता मात्र ही संवेदनशील वेळ असल्यामुळे आम्हाला काहीही बोलू नये असं सांगण्यात आलंय.'

चित्रपटासंदर्भात फक्त निर्माते बोलतील, असंही रणवीर सिंग सांगायला विसरला नाही.

First published: November 22, 2017, 1:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading