मुंबई, सप्टेंबर- बॉलिवूड कलाकार अनेकवेळा आपल्या ट्विटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात. अभिनेता रणवीर शौरीने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका फोटोवर ट्विट करत आपत्तीजनक शब्दांचा वापर केला आहे. त्याचा आहे ट्विट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याला ट्रोल केलं जात आहे.
I only deleted those tweets because I used questionable language. I see no shame in accepting my mistakes. https://t.co/aHbw1Kxh2h
— Ranvir Shorey (@RanvirShorey) September 29, 2021
बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सतत सोशल मीडियावर विविध राजकीय फोटो आणि मिम्स शेअर करत असतो. नुकताच रणवीर शौरीने आपल्या ट्विटरवर माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहरू यांच्यासोबतच एक अन्य व्यक्ती उभी आहे. या फोटोवर रणवीरने आपत्तीजनक शब्दांचा वापर केला आहे. हा ट्विट शेअर करताच रणवीर मोठया प्रमाणात सोशल मीडियावर ट्विट होऊ लागला होता. त्यानंतर रणवीरने तो ट्विट डिलीटही करून टाकला आहे. ट्विट डिलीट केल्यानंतर एका युजरने कमेंट करत अभिनेत्याला प्रश्न केला आहे. 'तुला ट्विट डिलीट करायची गरज का पडली? तू तुझ्या मुद्द्यावर ठाम नाहीस का?'
(हे वाचा:Samantha Akkineni खरंच मुंबईला शिफ्ट होणार? अभिनेत्रीने लाइव्ह येत दिलं उत्तर)
यावर उत्तर देत रणवीर शौरीने आपली चूक कबुल केली आहे. रणवीरने म्हटलं आहे, 'मी हे ट्विट यासाठी डिलीट केलं कारण मी त्यामध्ये चुकीच्या भाषेचा वापर केला होता. मला माझी चूक मान्य करण्यात अजिबात लाज वाटत नाही'. रणवीरच्या आधी ट्विट टाकण्यावरून आणि नंतर ती ट्विट डिलीट करण्यावरून सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. तसेच सर्व स्थरातून संमिश्र प्रतिक्रियासुद्धा येत आहेत.
(हे वाचा:तुझ्याकडून ही अपेक्षा...'अंडरवेअरच्या जाहिरातीत Rashmika Mandannaला पाहून भडकल )
अभिनेता रणवीर शौरी याने बॉलिवूडमधील काही मोजक्या चित्रपटात काम केलं आहे. रणवीरने 'एक था टायगर, सिंग इज किंग, इंग्लिश मिडीयम, लक्ष्य, खोसला का घोसला' अशा चित्रपटांत काम केलं आहे. तसेच रणवीर शौरी अनेक रिऍलिटी शोमध्येही दिसून आला होता. इतकंच नव्हे तर रणवीर शौरी हा अभिनेत्री कोंकणा सेनचा पती होता. मात्र त्यांचा घटस्फोट झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment