09 जानेवारी : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग साखरपुडा न करताच भारतात परतल्याने याबाबतच्या सगळ्या बातम्या निव्वळ अफवा ठरल्याचं आता स्पष्ट झालंय. पण दीपिकासाठी यंदाचा तिचा वाढदिवस काहीसा खास ठरला. कारण रणवीरच्या आई-वडिलांनी तिला वाढदिवसानिमित्त महागडं गिफ्ट दिलं. डायमंडचा सेट आणि फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीने डिझाईन केलेली साडी त्यांनी वाढदिवसाची भेट म्हणून दीपिकाला दिली.
दीपिकाही त्यांच्याकडून मिळालेलं हे गिफ्ट पाहून फारच खूश झालीये. दीपिका आणि रणवीर वाढदिवसाला श्रीलंकेत होते. 5 जानेवारीला दीपिका 32 वर्षांची झाली.
आता बॉलिवूडचं हे क्युट कपल कधी ऑफिशिअल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा