मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रदर्शनाआधीच रणवीर सिंगचा 83 वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

प्रदर्शनाआधीच रणवीर सिंगचा 83 वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

83 Movie: या सिनेमात दिग्दर्शक कबीर खान यांनी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या-वहिल्या क्रिकेट वर्ल्डकपची रंजक कहाणी आहे. दरम्यान प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 10 डिसेंबर: अभिनेता रणवीर सिंग स्टारर 83 (Ranveer Singh Starr 83) हा मोस्ट अवेटेड आणि बिग बजेट सिनेमा प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. संयुक्त अरब अमिरातीस्थित एका फायनान्स कंपनीने रणवीर सिंगच्या या सिनेमाच्या निर्मात्यांविरुद्ध दंडाधिकारी न्यायालयासमोर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. फ्युचर रिसोर्स एफझेडईने अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध आयपीसी कलम 406 (फसवणूक करणे), 420 (फसवणूक) आणि 120-बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या तक्रारीमध्ये विब्री मीडिया आणि त्याच्या संचालकांची नावे आहेत. वकील रिजवान सिद्दीकी यांच्यामार्फत दाखल केलेल्या तक्रारीत असा दावा करण्यात आला आहे की, या निर्मात्यांनी 83 हा चित्रपट तयार केला आणि तक्रारदाराची चित्रपटातील हक्कांची फसवणूक करण्याची योजना आखली.

हे वाचा-VIDEO : हार्ट अटॅक कसा येतो? जॉन अब्राहमने पाजळलं ज्ञान; मेडिकलचे विद्यार्थी शॉक

अलीकडेच रणवीर सिंह आणि त्याच्यासह तगडी स्टारकास्ट असणाऱ्या 83 या सिनेमाचा ट्रेलर (83 trailer hindi) लाँच झाला आहे. यामध्ये रणवीरसह अभिनेत्री दीपिका पादूकोण देखील या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात भारताने 1983 साली जिंकलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्डकपची कहाणी आहे.

दरम्यान 83 च्या निर्मात्यांविरोधात दाखल तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, Vibri मीडियाच्या संचालकांनी एप्रिल 2012 ते मार्च 2020 पर्यंतच्या कालावधीसाठी फेरफार केलेली आणि अतिशयोक्तीपूर्ण व्यवसाय योजना तसंच नफा आणि तोट्याचा अंदाज सादर केला. त्यांनी तक्रारदार कंपनीला 15.90 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले, असा आरोप तक्रारीत आहे. सुनावणीसाठी हे प्रकरण अद्याप समोर आलेले नाही.

या सिनेमात दिग्दर्शक कबीर खान यांनी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेल्या पहिल्या-वहिल्या क्रिकेट वर्ल्डकपची रंजक कहाणी आहे. भारतीय टीमने फायनलमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करून 1983 मध्ये त्यांची पहिली विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत चपखल बसत आहे. यात कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांची भूमिका दीपिका पादूकोण साकारत आहे.

हे वाचा-या PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

अभिनेते पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एमी विर्क, अदिनाथ कोठारे, धैर्य करवा आणि आर बद्री अशी जबरदस्त स्टार मंडळी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

First published:

Tags: Ranveer singh