मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रणवीर सिंहने 20 कोटी देऊन बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण; दाव्यानंतर कमाल आर. खानलाच धरलं धारेवर

रणवीर सिंहने 20 कोटी देऊन बॉलिवूडमध्ये केलं पदार्पण; दाव्यानंतर कमाल आर. खानलाच धरलं धारेवर

रणवीरसिंहचे फॅन्स कमाल आर. खान याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल (Troll) करताना दिसत आहेत.

रणवीरसिंहचे फॅन्स कमाल आर. खान याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल (Troll) करताना दिसत आहेत.

रणवीरसिंहचे फॅन्स कमाल आर. खान याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल (Troll) करताना दिसत आहेत.

  नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : बॉलिवूडमधले अभिनेते आणि अभिनेत्रींवर सातत्यानं टीका करण्यात किंवा त्यांना ट्रोल करण्यात जी मंडळी आघाडीवर असतात, त्यात कमाल आर. खान (Kamal R Khan) यांचा समावेश होतो. कमाल आर. खान सातत्यानं बॉलिवूड सेलेब्रिटींविषयी (Bollywood Celebrity) केलेल्या आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

  आतापर्यंत कमाल आर. खान यांनी अनेक सेलेब्रिटींविषयी नकारात्मक भाष्य (Negative Comment) केलं आहे. सध्या त्यांनी बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता रणवीरसिंहला (Actor Ranveer Singh) लक्ष्य केलं आहे. कमाल आर. खान यांनी यशराज फिल्मच्या बहुचर्चित बंटी और बबली 2 च्या प्रमोशनदरम्यान रणवीरसिंहविषयी वादग्रस्त खुलासा केला आहे. यामुळे रणवीरसिंहचे फॅन्स कमाल आर. खान याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल (Troll) करताना दिसत आहेत. रणवीरसिंहच्या बॉलिवूडमधल्या पदार्पणासाठी त्याच्या वडिलांनी यशराज प्रोडक्शनला (Yash Raj Production) 20 कोटी रुपये दिले, असा आरोप कमाल आर. खान यांनी केला आहे. याबाबतचं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

  कमाल आर. खान हे बॉलिवूड सेलेब्रिटींना वारंवार लक्ष्य करत असतात. काही महिन्यांपूर्वी 'राधे - युवर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि या चित्रपटाविषयी त्यांनी नकारात्मक भाष्य केलं होतं. हे प्रकरण इतकं वाढलं, की सलमान खानच्या लीगल टीमनं कमाल आर. खान यांच्याविरोधात कारवाई केली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं. त्यानंतर कमाल आर. खान अर्थात केआरके यांनी (KRK) आपण पुन्हा सलमान खानच्या चित्रपटांवर भाष्य करणार नसल्याचं सांगितलं.

  कमाल आर. खान यांनी आता रणवीरसिंहला लक्ष्य केलं आहे. रणवीरसिंहच्या बॉलिवूड पदापर्णासाठी यशराज प्रोडक्शनला त्याच्या वडिलांनी 20 कोटी रुपये दिल्याचं कमाल आर. खान यांनी म्हटलं आहे. यशराज प्रोडक्शन हाउसच्या `बँड बाजा बारात` या चित्रपटातून रणवीरसिंहनं पदार्पण केलं होतं. यात अभिनेत्री अनुष्का शर्मादेखील होती. या चित्रपटाला प्रेक्षकांसह समीक्षकांनीही पसंती दिली होती; मात्र याबाबत कमाल आर. खान म्हणतात, की `यशराज फिल्म्सनं रणवीरसिंहला लॉंच केलं आणि आज तो मोठा स्टार आहे, असं तुम्हाला वाटत असेल. परंतु, आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी रणवीरसिंहला लॉंच केलं नसून, रणवीरला आदित्य चोप्रांच्या माध्यमातून लॉंच करण्यात आलं. रणवीरच्या वडिलांनी आदित्य चोप्रा यांना 20 कोटी रुपये दिले होते. त्यानंतर यशराज फिल्म्सनं त्याला लॉंच केलं.`

  हे ही वाचा-सारेगमप स्पर्धकाला सलमान खान म्हणाला, तू एक विचित्र माणूस..video viral

  कमाल आर. खान यांनी यशराज प्रॉडक्शनअंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या 'बंटी और बबली 2' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हा दावा केला असून, या चित्रपटात आदित्य चोप्रा यांची पत्नी राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कमाल आर. खान या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहेत.

  First published:

  Tags: Salman khan