रणवीरचा अवतार पाहून फॅन्स म्हणाले- ‘गिफ्ट रॅप की चंद्रावर जाण्याची तयारी?’, किंमत वाचून व्हाल थक्क

रणवीरचा अवतार पाहून फॅन्स म्हणाले- ‘गिफ्ट रॅप की चंद्रावर जाण्याची तयारी?’, किंमत वाचून व्हाल थक्क

रणवीरचा एअरपोर्ट लूकही नेहमी वेगळा असतो. कपड्यांच्या चॉईसमुळे सोशल मीडियावर रणवीरच्या फोटोंचा वापर अनेकदा मीम्स बनवण्यासाठी करण्यात येतो.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : एक उमदा कलाकार म्हणून रणवीर सिंगकडे पाहिलं जातं. मात्र एखाद्या पुरस्कार सोहळ्यात किंवा टॉक शो दरम्यान रणवीर जे कपडे घालून येतो त्याची विशेष चर्चा होते. त्याच्या अतरंगी लूक्सबाबत फॅन्सकडून टीकाही होते आणि काही जण त्याच्या आत्मविश्वासाचीही दाद देतात. रणवीरचा एअरपोर्ट लूकही नेहमी वेगळा असतो. कपड्यांच्या चॉईसमुळे सोशल मीडियावर रणवीरच्या फोटोंचा वापर अनेकदा मीम्स बनवण्यासाठी करण्यात येतो.

रणवीरचा आणखी एक एअरपोर्ट लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणवीरची स्टाइलिस्ट निताशा गौरवने यावेळीही अतरंगी लूक त्याच्यासाठी डिझाइन केला आहे. फिल्मफेअर सोहळ्यावरून परतताना रणवीरने हा चमकणारा बुमबॉक्स आउटफीट परिधान केला होता. जेव्हा मुंबई विमानतळावरून रणवीर बाहेर आला तेव्हा त्याने गोल्डन सूटबरोबर काळा हायनेक टीशर्ट घातला होता. तर त्याच्या हातात बुमबॉक्स होता. काळ्या रंगाचा चष्मा आणि काळी टोपी त्याच्या अतरंगी पेहरावात आणखी भर घालत होती.

त्याचा हा अवतार पाहून पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणी रणवीरच्या ड्रेसची तुलना गिफ्ट रॅपिंग पेपरबरोबर केली आहे तर रणवीर चंद्रावर जायची तयारी करत असल्याचं म्हणालय. एका युजरने अशी कमेंट केली आहे की ‘मला वाटलं जादू परत आला’. एका युजरने रणवीरची तुलना लेडी गागाबरोबर करत त्याला भारतीय लेडी गागा म्हटलं आहे.

(हेही वाचा- 'मोगँबो खूश हुआ...', किंग खान पुन्हा एकदा व्हिलन ?)

गुवाहाटीमध्ये पार पडलेल्या फिल्मफेअर सोहळ्यामध्ये रणवीर सिंहचा सिनेमा 'गलीबॉय'ने एक-दोन नव्हे तर 13 पुरस्कार आपल्या खिशात टाकले. रणवीरला देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्याला जाताना देखील रणवीरने स्टाइलिश प्रिंटेड कपडे घातले होते. शनिवारी हा पुरस्कार सोहळा पार पडला, तेव्हा मात्र रणवीर रॉयल लूकमध्ये दिसला होता. मात्र मुंबईला परतताना रणवीरने घातलेला पेहराव नक्कीच डोळे दिपावणारा होता. रणवीरने मेटालिक शाइन असणारा बर्टहोल्ड ब्रँडचा कोट घातला होता. या कोटमध्ये हूड, स्नॅप बटन क्लोजर आणि पॉकेट्स आहेत. या सगळ्याची किंमत 46 हजार 400 रुपये आहे. तर त्यावर त्याने घातलेल्या ट्राउजरची किंमत 22 हजार 698 रुपये आहे

First published: February 17, 2020, 6:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या