दीपिकाने तिच्या चाहत्यांसाठी गहराइयां ( gehraiyaan) या सिनेमाचे पोस्टर आज वाढदिवसानिमित्त शेअर केले आहे. यामध्ये दीपिका सिद्धांत चतुर्वेदीला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये अनन्या पांडे दिसत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सिद्धांत चतुर्वेदी चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांच्या देखील भूमिका आहेत. शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी पूर्ण झाले आहे. गहराइयां हा सिनेमा अॅमेझॉन प्राइमवर (Amazon Prime Video)प्रदर्शित होणार आहे. वाचा-Deepika Padukone Net Worth:अभिनेत्रीकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती गहराइयां हा सिनेमा यापूर्वी 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र आता हा सिनेमा 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. दीपिकाने याची माहिती या पोस्टमध्ये दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता हा सिनेमा डायरेक्ट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाच्या फॅन्ससाठी ही पर्वणीच असणार आहे. यानिमित्त दीपिकाचे ओटीटीवर पदार्पण होणार आहे. चाहते यासाठी उत्सुक आहेत. दीपिकाच्या या पहिल्या डिजिटल डेब्यूला चाहते कसा प्रतिसाद देणार याची देखील उत्सुकता आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Deepika padukone, Entertainment, Ranveer singh