दीपिका-रणवीरच्या लग्नाचा नवा Photo झाला व्हायरल

दीपिका-रणवीरच्या लग्नाचा नवा Photo झाला व्हायरल

दीपवीरचे लग्नाचे फोटो तर बाहेर आले. भरपूर व्हायरलही झाले.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : दीपवीरचे लग्नाचे फोटो तर बाहेर आले. भरपूर व्हायरलही झाले. दोघांनी कोकणी आणि सिंधी पद्धतीनं लग्न केलंय. आता त्यांचा आणखी एक फोटो बाहेर आलाय. लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत हा फोटो आहे.


रणवीर सिंगची स्टाइलिश निताशा गौरवनं हा फोटो शेअर केलाय. फोटोत रणवीर पांढऱ्या शेरवानीत तर दीपिका लाल आणि गोल्डन रंगाच्या साडीत दिसतेय. फोटोत निताशा आणि हेअर स्टाइलिश दर्शन वालेकरही आहे.


लग्नाला एकूण 40 पाहुणे आले होते. ही रोमँटिक जोडी अजून इटलीला आहे. 18 नोव्हेंबरला परत भारतात येतील.
अशी माहिती कळली आहे की लग्न सोहळ्याला शाहरुख खान, फराह खान आणि संजय लीला भन्साळी उपस्थित होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार या रिसाॅर्टमध्ये दोघं उतरलेत, त्याला 75 रुम्स आहेत. 4 रेस्तराँ आणि बार आहेत. शिवाय 4 कान्फरन्स रूम्स, एक स्पा, इनडोर स्विमिंग पूलही आहे.


एका रूमची किंमत 400 युरो म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे 33 हजार आहे. या हाॅटेलमध्ये दिवसभर राहायचं असेल तर 24 लाख 75 हजार रुपये मोजावे लागतील. तर पूर्ण आठवडाभरासाठी याची किंमत आहे 1 कोटी 73 लाख 25 हजार रुपये.


कृपया पुष्पगुच्छ वा आहेर आणू नयेत ही विनंती.. हा मजकूर तुम्ही लग्नाच्या पत्रिकेवर पाहिला असेल.असंच काहीसं म्हणत आहेत बॉलिवूडची लग्नाळू जोडी रणवीर -दीपिका. लग्नाला भेटवस्तू न स्वीकारता ही भेट डोनेशनच्या रूपात 'लिव्ह लव्ह लाफ' या दीपिका पदुकोणच्या फाऊंडेशनला द्यावी अशी विनंती दीपिका-रणवीर यांनी लग्नपत्रिकेवर केली.


लिव्ह लव्ह लाफ हे नॉन प्रॉफिटेबल चॅरिटी फाऊंडेशन नैराश्याने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी काम करतं.  महागड्या भेटवस्तू न देता ही अनोखी मदत त्यांना मिळावी हा एक  प्रयोग या जोडीने केलाय.लग्न करणाऱ्या अनेकांसाठी हा नवा आदर्श नक्कीच ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2018 10:07 AM IST

ताज्या बातम्या