रणवीर सिंगचा शर्टलेस फोटो पाहून हा कॉमेडियन म्हणाला- जब लगावे तू लिपिस्टिक...

रणवीर सिंगचा शर्टलेस फोटो पाहून हा कॉमेडियन म्हणाला- जब लगावे तू लिपिस्टिक...

रणवीर सिंगने त्याचा फोटो शेअर केला तर इन्स्टाग्रामवर त्याची थट्टा उडवायला सुरुवात झाली.

  • Share this:

मुंबई, 03 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने नुकताच सोशल मीडियावर त्याचा एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो स्वतःची टोंड बॉडी दाखवताना दिसत आहे. सोशल मीडियावर मजेशीर कमेंट करण्यासाठी रणवीर ओळखला जातो. आताही स्वतःचा शर्टलेस फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, ‘Me looking at you eating carbs like.’

रणवीरने त्याचा फोटो शेअर केला तर इन्स्टाग्रामवर त्याची थट्टा उडवायला सुरुवात झाली. झोया अख्तरने स्मायलिंग इमोजी शेअर करत ‘बिहेव’ असं लिहिलं. तर विनोदवीर तन्मय भट्टने एक भोजपुरी गाणं लिहून कमेंट केली. तन्मयने लिहिले की, जब लगावे तू लिपिस्टिक... हिलेला सारा डिस्ट्रिक्ट

 

View this post on Instagram

 

Me looking at you eating carbs like

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

झोयाशिवाय बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियानेही या फोटोवर कमेंट केली. त्याने लिहिले की, ‘स्वीट पोटॅटो बॉस. लवली. लुकिंग फुल अँड फायनल.’ रणवीरच्या या फोटोला आतापर्यंत 20 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

रणवीरच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो 83 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपची कहाणी सांगण्यात येणार आहे. यात रणवीर, कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. एवढंच नाही तर त्याच्या पत्नीची भूमिका दीपिका पदुकोण साकारणार आहे. पुढच्या वर्षी 10 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मनसेसमोर अभिनेता अक्षय कुमारची माघार, Mission Mangal चं यू-टर्न

हॉटेलमधून शॅम्पूच्या बाटल्या चोरायची दीपिका, बेस्ट फ्रेंडने सांगितलं गुपित

करण जोहरच्या 'ड्रग पार्टी'विरोधात आमदाराने लिहिलं Open Letter

बॉलिवूडच्या या 5 कपल्सनी सर्वांसमोर दिली होती नात्याची कबुली

विद्या बालनच्या आयुष्यात नवी 'कहाणी' पाहा हा VIDEO

Published by: Madhura Nerurkar
First published: August 3, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading