VIDEO: पाहा दीपिकावर किती प्रेम करतो रणवीर, फिल्मफेअरमध्ये झाला भावूक

VIDEO: पाहा दीपिकावर किती प्रेम करतो रणवीर, फिल्मफेअरमध्ये झाला भावूक

65व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर स्टेजवरून रणवीरने बायको दीपिकाचे आभार मानले.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या लोकप्रिय आहेत. या जोड्यांमधीलच एक म्हणजे दीपवीरची जोडी म्हणजे दीपिका आण रणवीरची जोडी. या जोडीला बॉलिवूडमधील सर्वात रोमँटीक जोडीदेखील म्हटलं जातं. रणवीर दीपिकाप्रती असलेलं प्रेम व्यक्त करण्याची कुठलीच संधी सोडत नाही. कोणताही कार्यक्रम असो वा अॅवॉर्ड फंक्शन. रणवीर बिनधास्तपणे सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली देत असतो. दीपिकाला स्पेशल फिल करून देण्यासाठी रणवीर नेहमीच काहीना काही युक्त्या लढवत असतो.

नुकतच पार पडलेल्या 65व्या फिल्मफेअर अॅवॉर्ड सोहळ्यातही रणवीरच प्रेम बघून सगळ्यांनाच आनंद झाला. रणवीरला यंदा गल्ली बॉय चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार घेतल्यानंतर रणवीरने आपली बायको दीपिका हिचे आभार मानले. रणवीर म्हणाला, “मागच्या वर्षी माझं आणि दीपिकाचं लग्न झालं आणि मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आणि यावर्षी मला पुन्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. दीपिका खऱ्या अर्थाने माझ्या घरातील लक्ष्मी आहे. आय लव्ह यू.” रणवीरने दीपिकाला थँक्यू म्हटल्यानंतर सर्वच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या.

बॉलिवूडकरांसाठी दीपिका आण रणवीरचा रोमँटीक अंदाज नवा नाही. रणवीर याआधीही अॅवॉर्ड शोमध्ये  दीपिकाला घरातील लक्ष्मी म्हणाला होता. आणि दोघेही भावूक झाले होते. यावर्षी दीपिका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नव्हती मात्र तरिही रणवीरने स्टेजवरून दीपिकाचे आभार मानले.

रणवीर आणि दीपिका सोशल मीडियावर चर्चेत असतात. कधी दोघांचीही ड्रेसिंग स्टाईलमुळे, तर कधी दोघांच्या बोल्ड, रोमँटिक अंदाजामुळे. दोघांच्या या केमिस्ट्रीमुळेच त्यांना बॉलिवूडमधील हॉट आणि रोमँटीक कपल म्हटलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2020 11:10 AM IST

ताज्या बातम्या