S M L

Video : सहा महिन्यानंतर दीपिकाची गुड न्यूज? पहा रणवीर काय म्हणतोय?

रणवीर सिंगला मीडियानं घेरलंच होतं. यावेळी करण जोहर, रोहित शेट्टीही उपस्थित होते. एका महिला पत्रकारानं रणवीरला विचारलं, तू मागे म्हणाला होतास सहा महिन्यानं दीपिका आई बनणार आहे. हे खरं की खोटं?

Updated On: Dec 5, 2018 09:58 AM IST

Video : सहा महिन्यानंतर दीपिकाची गुड न्यूज? पहा रणवीर काय म्हणतोय?

मुंबई, 5 डिसेंबर : दीपिका-रणवीरचं लग्न झालं, रिसेप्शन झालं. त्यानंतर रणवीर सिंग कामाला लागला. लगेचंच सिंबाचं ट्रेलर लाँच होतं. आता ट्रेलर लाँचला रणवीर सिंगला लग्न, दीपिका याबद्दल प्रश्न विचारणार नाही, असं शक्यच नाही.

रणवीर सिंगला मीडियानं घेरलंच होतं. यावेळी करण जोहर, रोहित शेट्टीही उपस्थित होते. एका महिला पत्रकारानं रणवीरला विचारलं, तू मागे म्हणाला होतास सहा महिन्यानं दीपिका आई बनणार आहे. हे खरं की खोटं? त्यावर सगळेच थक्क झाले. रणवीरकडे बघायला लागले. मग रणवीर त्याच्या स्टाइलनं बोलला, मी दीपिकाला 2012मध्ये भेटलो आणि तेव्हाच हे म्हणालो होतो.


( सौ. - वायरल बाॅलिवूड )


Loading...

त्यानंतर ती पत्रकार रोहित शेट्टीकडे वळली, तेव्हा रोहित म्हणाला, माझं असं सहा महिन्यांचं काही चक्कर नाही. यावर सगळेच हसायला लागले.

सिंबा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मराठी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी बाजीराव-मस्तानी सिनेमातून रणवीर मराठमोळ्या लुकमध्ये दिसला होता. करण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा सिनेमा पोलिसांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तेलगु भाषेतील 'टेंपर' सिनेमाचा रिमेक आहे.

सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खान सिनेमात उत्तम मराठी बोलताना दिसणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील धाडधकट कलाकार सोनू सूड खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपटात रणवीर लाच घेणारा पोलीस दाखवण्यात आला आहे एका घटनेनंतर अचानक त्याच्यात बदल झाल्यानं चित्रपाटात पुढे नेमकं काय घडणार हे ट्विस्ट असणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात अजय देवगणची झलकसुद्धा पाहायला मिळणार आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटात गाड्या उडवणाऱ्या रोहित शेट्टीने यावेळी वेगळ्या अंदाजमध्ये गाड्यांचा वापर केला आहे. सिनेमातील रणवीरची अॅक्शन स्टाईल आणि साराची मराठी डायलॉग डिलिव्हरी पाहायला प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. लग्नानंतर रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा असणार आहे. लग्नातील सर्व फोटोनंतर रणवीरचा पहिला ट्रेलर लुक सिंबा सिनेमातून समोर येत आहे.


Video : लग्नात परिणितीने लपवले निकचे बूट आणि किती रुपये मागितले पाहा...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 09:58 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close