मुंबई, 07 मार्च : 1983 मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक (World Cup 1983) जिंकला होता. त्यावेळचे अनेक क्षण अजूनही क्रिकेट चाहत्यांना लख्ख आठवतात. विश्वचषकाची ट्रॉफी अभिमानाने उंचावत दिसणारे त्यावेळचे कॅप्टन कपिल देव. हा फोटो आजही अनेकांच्या स्मरणात आहे. भारताच्या विश्वचषक विजयाची कहाणी सांगणार ’83’ हा सिनेमा घेऊन रणवीर सिंह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधीही या सिनेमातील अनेक क्षण त्याने शेअर केले आहेत. मात्र सध्या त्याने शेअर केलेला फोटो अगदी खास आहे.
रणवीर सिंहने आपल्या इन्स्टाग्रामवर कपिल देव यांनी ट्रॉफी उंचावतानाचा फोटो रिक्रेएट करत शेअर केला आहे. यामध्ये रणवीर सिंह हुबेहूब कपिल देव यांच्यासारखा दिसत आहे. 1983 मध्ये जिंकलेला वर्ल्डकप भारतासाठी खास होता. भारताने जगज्जेता वेस्ट इंडिजला धूळ चारत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं.
हे फोटो शेअर करण्याआधी देखील रणवीरने अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याच्या दीपिकाबरोबच्या फोटोला अधिक पसंती मिळाली होती. या चित्रपटामध्ये मोठी स्टारकास्ट आहे.10 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून कबीर खानने याचं दिग्दर्शन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.