लग्न-बर्थडे पार्टीमध्ये मनोरंजन करण्यास रणवीर सिंह तयार, दीपिका म्हणते...

नव्या लुकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत रणवीरनं याची माहिती दिली. त्यावर दीपिकानंही तिची प्रतिक्रिया दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 03:33 PM IST

लग्न-बर्थडे पार्टीमध्ये मनोरंजन करण्यास रणवीर सिंह तयार, दीपिका म्हणते...

मुंबई, 31 ऑक्टोबर : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खरं तर ग्लॅमरसाठी ओळखली जाते. मात्र तरीही काही अभिनेते असे आहेत जे आपल्या हटके अंदाजात चाहत्यांची मनं जिंकतात. अशा अभिनेत्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंह. बॉलिवूडचा सिंबा नेहमीच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. पण सध्या तरी त्याचा नवा लुक आणि त्याखालील त्याचं कॅप्शन सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. रणवीरच्या या फोटोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणची कमेंट मात्र चाहत्यांना आवडलेली दिसत आहे.

रणवीर सिंह मागच्या बऱ्याच दिवसांपासून दाढी आणि मिशा ठेवलेल्या लुकमध्ये दिसत होता. हा लुक त्यानं त्याचा आगामी सिनेमा 83 साठी ठेवला होता. मात्र आता या सिनेमाचं शूटिंग संपलं असून रणवीरनं त्याचा लुक सुद्धा बदलला आहे. आपल्या नव्या लुकमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत रणवीरनं त्याला मजेशी कॅप्शन सुद्धा दिलं आहे. त्यानं लिहिलं, ‘लग्नाचा सीझन आला आहे. भाड्यानं एंटरटेनर मिळेल. लग्न , बर्थडे पार्टी आणि मुंज अशी इव्हेंटसाठी उपलब्ध.’

बॉलीवूडच्या 'या' अभिनेत्याला करायचाय अक्षय कुमारचा बायोपिक

Loading...

 

View this post on Instagram

 

Shaadi Season is here! Entertainer for Hire. 🕺🏿 Available for events, wedding, budday party, mundan 🎊

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरच्या या मजेदार कॅप्शनवर अनेक प्रतिक्रिया मिळत आहेत. अगदी अर्जुन कपूर पासून ते अनुपम खेर आणि एकता कपूरपर्यंत सर्वांनी रणवीरच्या या फोटोवर कमेंट केल्या आहेत. पण या सगळ्यात दीपिका पदुकोणच्या कमेंटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दीपिकानं लिहिलं, ‘रणवीर सिंहला इव्हेंटमध्ये बोलावण्यासाठी दीपिका पदुकोणशी संपर्क साधावा.’

दीपिका पदुकोण ते सनी लिओनी, 'ही' आहेत तुमच्या लाडक्या स्टार्सच्या भीतीची कारणं

काही मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंहनं हा क्लिन शेव्ह लुक त्याचा आगामी सिनेमा तख्तसाठी ठेवला आहे. सध्या रणवीरकडे सिनेमांची रांग लागली आहे. त्याच्याकडे ‘83’ व्यतिरिक्त जयेशभाई जोरदार हा सिनेमा आहे. पण सध्या तरी सर्वाना त्याचा आगामी सिनेमा 83 च्या रिलीजची उत्सुकता आहे. या सिनेमात रणवीर माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. याशिवाय या सिनेमात दीपिका पदुकोणही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या सिनेमात कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकारत आहे.

'..स्वस्तातल्या साडीसाठी गुजरात ठीक आहे, नेतानिवडीसाठी नाही'

===================================================================================

VIDEO : परतीच्या पावसानं तोंडचा घासही हिरावला, लाखोंची द्राक्ष बाग उद्ध्वस्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 03:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...