Elec-widget

Video : लग्नानंतर रणवीरचे हरपले भान, बिंते दिल गाण्यावर केला मोहक डान्स

Video : लग्नानंतर रणवीरचे हरपले भान, बिंते दिल गाण्यावर केला मोहक डान्स

यंदाचं वर्ष रणवीर सिंगसाठी फार खास आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याचा 'पद्मावत' सिनेमा रिलीज झाला आणि दिपिकासोबत लग्न झालं. आता वर्षाच्या शेवटी रणवीरचा सिंबा सिनेमा रिलीज होणार आहे. याच सिनेमाच्या प्रोमोशनसाठी कानपूरवाले खुरानाज शोमध्ये तो धमाल करताना दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : रणवीर सिंग सध्या लग्नामुळे बरेच चर्चेत आला आहे. 2018 हे वर्ष रणवीरसाठी महत्त्वाचं ठरलं आहे. कारण यावर्षी  त्याला मिळालेला ब्लॉक बस्टर सिनेमा पद्मावत रिलीज झाला आणि दीपिका पदुकोणसोबत त्याचं आयुष्यभराचं नातं जोडलं गेलं. लग्नानंतरही रणवीरच्या डोक्यातून पद्मावतचं वेड काही जाता जात नाही आहे. कारण यावेळी तो खिलजीच्या नव्हे तर मलिक कफूरच्या भूमिकेत दिसला आहे.

रणवीर सिंगनं यावेळी सुनील ग्रोव्हरसोबत 'बिंते दिल...' गाण्यावर नाच केला आहे. स्टार प्लसवर येणारा शो 'कानपूरवाले खुरानाज'मध्ये सुनीलसोबत दिसणार आहे. विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हर एक नवा विनोदी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. कॉमेडी नाईट विथ कपिल शोमधून बाहेर पडून स्वत:चा विनोदी शो घेऊन सुनील समोर येत आहे. यामध्ये सुनील खिलजीच्या भूमिकेत दिसत असून रणवीरसोबत धमाल करताना दिसणार आहे. रणवीरच्या सिंबा सिनेमाच्या प्रोमोशनने कानपूरवाले खुरानाज या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. शोमध्ये रणवीर सिंग, रोहित शेट्टी तसेच सारा अली खानसुद्धा हजर राहणार आहे. सिंबा सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनने केली असल्याने करण जोहरसुद्धा या शोच्या लाँचिंगला हजर असेल.

नुकताच रणवीरच्या सिंबा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरला लोकांनी छान पसंती दिली आहे. त्याचबरोबर सिनेमातील गाणीही प्रेक्षकांना आवडत आहेत. याच सिनेमाच्या प्रोमोशनसाठी सिंबाची टीम कानपूरवाले खुरानाज कार्यक्रमात येणार आहे. पण इथे येऊन रणवीर पद्मावतच्या अंदाजामध्ये दिसला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2018 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...