मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नववर्षाचं सेलिब्रेशन की रणबीर-आलियाचं लग्न? जयपूरमध्ये पोहोचली कलाकार मंडळी

नववर्षाचं सेलिब्रेशन की रणबीर-आलियाचं लग्न? जयपूरमध्ये पोहोचली कलाकार मंडळी

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय दोघांनीही लवकरात लवकर लग्न करावं अशा कमेंट्स त्यांना चाहत्यांकडून मिळत आहेत. अशातच नीतू कपूर यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे ही चर्चा विशेष रंगली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 30 डिसेंबर : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) देखील आहे. हे सेलेब्स जयपूरमध्ये एकत्र आले आहे. मात्र हे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. चाहत्यांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे की, नेमके हे सेलिब्रिटी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले आहेत की आलिया-रणबीरच्या लग्नासाठी? व्हायरल झालेला हा फोटो नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

मंगळवारी रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोण (Deepika Padukone) मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झाले होते. यावेळी दोघांनी 'colour-coordinated' आउटफिट परिधान केलं होतं. Viral Bhayani ने त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

दरम्यान अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झाले होते. यावेळी त्यांच्याबरोबर नीतू कपूर आणि रिधीमा कपूर साहनी या देखील होत्या. संपूर्ण कुटुंबासह रणबीर एअरपोर्टवर दिसल्याने चाहत्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. अनेकांनी कपूर कुटुंबीय रणबीर-आलियाच्या लग्नासाठी जयपूर गाठले आहे की काय असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरने आलियाबरोबरच्या त्याच्या नात्याबाबत भाष्य केले होते. त्याचप्रमाणे रणबीर आणि आलिया लवकरच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. रणबीर-आलिया ही जोडी अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Deepika padukone, Ranbir kapoor, Ranveer singh