Home /News /entertainment /

करण जोहरची भविष्यवाणी ठरली खोटी; पाहा रणवीर सिंग विषयी काय म्हणाला होता करण

करण जोहरची भविष्यवाणी ठरली खोटी; पाहा रणवीर सिंग विषयी काय म्हणाला होता करण

रणवीरविषयी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक , निर्माता करण जोहरने (Karan Johar) एक वेगळचं भाकीत केलं होतं.

  मुंबई 26 जून : बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) आपली एक वेगळी छाप सोडली आहे. आपल्या करिअरला त्याने एक वेगळाच वेग दिला आणि सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले. अनेक सुपरहिट चित्रपट रणवीरने दिले. पण रणवीरविषयी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने (Karan Johar) एक वेगळचं भाकीत केलं होतं. करण जोहरने आजवर अनेक नवोदित अभिनेते अभिनेत्रींना लाँच केलं आहे. तर अनेकांच्या करिअरची सुरूवातचं करणने केली आहे. करणने रणवीरच्या करिअरच्या सुरूवातीच्या काळावर एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. करणच्या म्हणण्यानुसार त्याला सुरूवातीला रणवीर सिंगमध्ये हिरो सारखी कोणतीच गोष्ट दिसत नव्हती.

  श्रीदेवींच्या निधनानंतर अर्जुन-जान्हवीमधील दुरावा झाला कमी; भाऊ-बहिणीच नातं झालं घट्ट

  2019 मध्ये एका मुलाखतीत करणणे हे सांगितलं होतं. तो म्हणाला होता, “मला रणवीरमध्ये कोणतीच स्टार वाली गोष्ट दिसत नव्हती. मला वाटत होतं त्याने चित्रपटांत येऊ नये.” पण रणवीरचा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर करणने आपलं मत बदललं तो म्हणाला, “रणवीरचं काम पाहिल्यावर मला वाटलं हा मुलगा तर सुपस्टार आहे.”
  View this post on Instagram

  A post shared by Karan Johar (@karanjohar)

  त्यानंतर करणने आणखी काही गोष्टींचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता, “हा काळ सुपरस्टार्सचा नाही तर अभिनय करणाऱ्यांचा आहे. जर तुम्ही अभिनय करू शकत नसाल तर सुंदर बॉडी असणं निरर्थक आहे.” रणवीर सिंग लवकरच करणच्या दोन चित्रपटांत दिसणार आहे.

  ‘पायल रोहतगीला अटक करण्यासाठी पोलिसांनी घेतले पैसे’; संग्राम सिंगचा मोठा आरोप

   करण जोहर रणवीर त्याच्या पहिल्या ‘तख्त’ (Takhta) या मल्टीस्टारर चित्रपटात कास्ट करत आहे. तर यानंतर गली बॉय फेम रणवीर, आलियाची जोडी करणच्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात असलं तरीही या प्रोजेक्टवर जोमान काम सुरू आहे व तख्तच्या आधी हाच चित्रपट येणार असल्याच्या चर्चा आहेत.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood, Entertainment, Karan Johar, Ranveer singh

  पुढील बातम्या