मुंबई, 13 डिसेंबर : अभिनेता रणवीर सिंह सध्या चांगलाच लाइम लाइटमध्ये आहे. रणवीर सध्या सर्कस सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी तो प्रमोशनसाठी हजेरी लावत आहे. अशातच रविवारी मुंबईतील एका इव्हेटमध्ये सर्कसच्या टीमनं हजेरी लावली होती. तिथे संपूर्ण टीम तमाम प्रेक्षकांशी संवाद साधला. रणवीरला पाहण्यासाठी इव्हेंटमध्ये प्रचंड गर्दी झाली होती.अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात रणवीर एका लहान मुलाला उचलून घेताना दिसत आहे. नेमकं इव्हेंटमध्ये काय झालं ? रणवीरनं उचलून घेतलेला तो मुलगा कोण आहे? जाणून घ्या.
सर्कसच्या प्रमोशनसाठी गेलेल्या रणवीरला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. मालाडमध्ये हा इव्हेंट आयोजित केला होता. तिथे रणवीर आणि टीमनं स्टेजवर सिनेमातील गाण्यावर धम्माल डान्स केला आणि सगळ्यांना चांगलंच नाचवलं. रणवीरला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीचा व्हिडीओ सध्या पाहायला मिळतोय. रणवीरही इतक्या गर्दीत फॅन्सला फ्लाइंग किस देताना दिसत आहे.
हेही वाचा - काश्मीर फाइल्सपासून रणवीर सिंहच्या फोटोशूटपर्यंत, 'हे' ठरले 2022 मधील सर्वात मोठे बॉलिवूड वाद
View this post on Instagram
इव्हेंटमध्ये सर्कसचं प्रमोशन करून सगळे निघत असताना रणवीरच्या भोवती प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत एक लहान मुलगा हरवला होता. रडत रडत तो स्टेजच्या दिशेनं आला. स्टेजवरून खाली उतरत असताना गर्दीत रडणाऱ्या त्या मुलाला रणवीरनं पाहिलं. त्या तुडूंब गर्दीत रडणाऱ्या मुलाला पाहताच रणवीरनं त्याला उचलून घेतलं आणि मायेनं त्याला डोक्यावरून हात फिरवला. त्याला भिती वाटू नये म्हणून त्यानं त्याला मिठीही मारली आणि त्याच पोझिशनमध्ये तो स्टेजवरून खाली उतरला. रणवीरच्या फॅन पेजवरून त्याचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. रणवीरच्या या एका कृतीनं त्यानं लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
रणवीरचा सर्कस हा सिनेमा येत्या 23 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणवीरबरोबर जॉनी लिव्हरस वरूण शर्मा, जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, संजय मिश्रा, मुकेश तिवारी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. क्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताला प्रेक्षकांसाठी हा सिनेमा खास ठरणार आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News