रणवीरनं अक्षय कुमारला टाकलं मागे, पण नंबर वन 'हाच' अभिनेता

रणवीरनं अक्षय कुमारला टाकलं मागे, पण नंबर वन 'हाच' अभिनेता

रणवीर सिंगचा सिंबा बाॅक्स आॅफिसवर अगदी धूम माजवतोय. 9 दिवसात सिनेमानं 170 कोटी रुपये कमावले.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : रणवीर सिंगचा सिंबा बाॅक्स आॅफिसवर अगदी धूम माजवतोय. 9 दिवसात सिनेमानं 170 कोटी रुपये कमावले. त्यामुळे जास्त कमाई करणाऱ्यांमध्ये रणवीर सिंग अक्षय कुमारच्या पुढे गेलाय.

रणवीर सिंगच्या आधी दुसऱ्या नंबरवर अक्षय कुमार होता. 2012मध्ये अक्षयचे 5 सिनेमे रिलीज झाले होते. त्यावेळी त्यानं एका वर्षात 413.22 कोटींची उलाढाल करून रेकाॅर्ड केला होता. रणवीर सिंगनं पद्मावत आणि सिंबा दोन्ही सिनेमांतून बरीच मजल मारली. त्यानं 466.95 कोटींचा व्यवसाय केला. सिंबा अजूनही हाऊसफुल जातोय.

या दोघांपेक्षा पुढे आहे सलमान खान. प्रेम रतन धन पायो आणि बजरंगी भाईजान सिनेमामुळे त्यानं 530. 50 कोटींचा व्यवसाय केला. रणवीर आणि सलमानच्या दरम्यान 70 कोटींचं अंतर आहे.

रणवीरचा फेब्रुवारीत गली बाॅय रिलीज होईल. त्यात तो रॅपर बनलाय. अभिनेत्री अमृता सुभाष त्यात रणवीरची आई बनलीय.

आमच्याशी बोलताना अमृतानं रणवीरबद्दल बरंच शेअर केलं. सेटवर तर अमृता आणि रणवीरच्या छान गप्पा सुरू असायच्या. पद्मावतबद्दल दोघांचं एकमत झालं. अमृता म्हणाली, जेव्हा कुणी सिनेमात खलनायक साकारतो, तेव्हा त्या अभिनेत्याला त्या खलनायकावर प्रेम करावं लागतं. रणवीरचा खिलजी पाहिला, तर त्याला कधी प्रेमच मिळालं नाही, असं वाटतं. म्हणून तो तसा वागतो. आणि रणवीरचंही तेच मत पडलं. ही भूमिका करण्याआधी रणवीर म्हणाला, मी मनात खिलजीपुढे अनलव्हड लिहिलं होतं.

रणवीर नेहमी धमाल करणारा, म्हणून ओळखला जातो. पण गली बाॅयमध्ये रणवीर शांत दाखवलाय. त्यामुळे सेटवरही तो तसाच होता. त्यानं अमृताला सांगितलं की झोया अख्तरचे सिनेमे आव्हानात्मक वाटतात. कारण ते करताना खूप अंतर्मुख व्हायला होतं.


करण जोहरच्या तोंडून निघालं मलायका-अर्जुनच्या नात्यातलं सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2019 07:22 PM IST

ताज्या बातम्या