Home /News /entertainment /

Box Office वर 83 आपटल्यानंतर रणवीर सिंहला मोठा धक्का! आता हे काम न करण्याचा केला निश्चय

Box Office वर 83 आपटल्यानंतर रणवीर सिंहला मोठा धक्का! आता हे काम न करण्याचा केला निश्चय

पॉझिटिव्ह रिव्ह्यूज येऊनसुद्धा रणवीर सिंहच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (83 Box office collection) फारशी कमाई करता आली नाही. या चित्रपटाची कमाई इतकी कमी झाली आहे, की हा चित्रपटसृष्टीचा सर्वांत जास्त तोट्यात गेलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 29 जानेवारी: रणवीर सिंहचा '83' (Ranveer Singh 83 Movie) हा चित्रपट समीक्षकांना प्रचंड आवडला आहे. जवळपास सर्वच समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला चांगले रिव्ह्यूज दिले आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी उचलून धरलं आहे. एवढंच नाही, तर स्टार्सनीदेखील या चित्रपटाला ‘मास्टरपीस’ म्हणून त्याचं कौतुक केलं आहे. परंतु, इतके पॉझिटिव्ह रिव्ह्यूज येऊनसुद्धा रणवीरसिंहच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर (83 Box office collection) फारशी कमाई करता आली नाही. या चित्रपटाची कमाई इतकी कमी झाली आहे, की हा चित्रपटसृष्टीचा सर्वांत जास्त तोट्यात गेलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो आहे. एस. एस. राजमौली यांच्या 'आरआरआर'सारख्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. तुलनेने कोरोना साथीचं प्रमाण कमी असतानाही '83'ने दोन आठवड्यांत फक्त 91 कोटी 78 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे ही चिंतेची बाब आहे. 'आरआरआर' रिलीज झाला असता तर सध्याचा 91 कोटींचा आकडा गाठणंही या चित्रपटासाठी कठीण झालं असतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर जोपर्यंत ‘83’च्या कमी कमाईमुळे लागलेला हा डाग पुसला जात नाही, तोपर्यंत एकही बायोपिक न करण्याचा निर्णय रणवीर सिंहने घेतला असल्याचं बोललं जात आहे. हे वाचा-सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिलला अश्रू अनावर; दबंग खानही झाला भावूक VIDEO खरं तर एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रणवीर सिंहचे या आधीचे ‘पद्मावत’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ हे चित्रपटदेखील बायोपिक प्रकारचेच होते; पण या चित्रपटांनी त्याला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्यामुळे रणवीरसिंहला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या. त्याने '83' या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती. ती मेहनत चित्रपटात स्पष्टपणे दिसून येते आहे. ज्या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप आशा होत्या, त्या चित्रपटाची एवढी कमी कमाई बघितल्यावर रणवीर सिंहला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. रणवीरसिंहची पत्नी, अभिनेत्री दीपिका पदुकोण स्वतः या चित्रपटाची निर्माती आहे. तसंच तिने या चित्रपटात माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांच्या पत्नीची भूमिकादेखील निभावली आहे. E24 ला दिलेल्या एका खास मुलाखतीत या चित्रपटाचा दिग्दर्शक कबीर खान याने असंही सांगितलं आहे, की या चित्रपटाला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. या चित्रपटाला चाहत्यांच्या आणि समीक्षकांचं केवळ कौतुकच खूप मिळालं आहे. हे वाचा-Lata Mangeshkar :...म्हणून 2 दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला आता चाहत्यांच्या नजरा रणवीर सिंहच्या आगामी चित्रपटावर खिळल्या आहेत. 'जयेश भाई जोरदार' हा त्याचा पुढचा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर “रॉकी और रॉनी की प्रेम कहानी” या करण जोहरच्या नवीन चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत आलिया भट काम करताना दिसून येणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या 'सर्कस'चं शूटिंगही पूर्ण झाले आहे. रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई असंच गणित असतं, असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे रणवीरसिंहकडे आगामी काळात एकापेक्षा एक सरस चित्रपट आहेत यात शंका नाही.
First published:

Tags: Bollywood actor, Ranveer singh

पुढील बातम्या