News18 Lokmat

VIDEO : रणवीर सिंगनं 'सिंबा' पाहायला आलेल्या स्त्रीला केलं KISS आणि मग...

थिएटरमध्ये रणवीरला पाहिल्यावर सगळ्यांनीच त्याला घेरलं. एक स्त्री पुढे येऊन रणवीरला म्हणाली, माझा पाय फ्रॅक्चर झालाय, तरीही मी सिंबा पाहायला आले.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 04:40 PM IST

VIDEO : रणवीर सिंगनं 'सिंबा' पाहायला आलेल्या स्त्रीला केलं KISS आणि मग...

मुंबई, 01 जानेवारी : सध्या बाॅक्स आॅफिसवर सिंबा तुफान चाललाय. प्रेक्षक सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी करतायत. सिंबाचा प्रतिसाद पाहायला थिएटरमध्ये चक्क रणवीर सिंग रोहित शेट्टसोबत पोचला.

थिएटरमध्ये रणवीरला पाहिल्यावर सगळ्यांनीच त्याला घेरलं. एक स्त्री पुढे येऊन रणवीरला म्हणाली, माझा पाय फ्रॅक्चर झालाय, तरीही मी सिंबा पाहायला आले. त्यावर रणवीरनं त्या महिलेची गालावर पापी घेतली.  तो व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

View this post on Instagram

The most loved actor #ranveersingh

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


रणवीरचा सिंबा आता 96 कोटींपर्यंत पोचलाय. शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला. रविवारी सिनेमानं 31.06 कोटी कमाई केलीय. आतापर्यंत सिनेमानं 75.11 कोटी कमाई केलीय. बाॅक्स आॅफिसवर पहिल्या दोन दिवसात 44 कोटींचा गल्ला जमवलाय. सिनेमानं परदेशातही दोन दिवसात 24.22 कोटी मिळवलेत.

रणवीर सिंग आपल्या अख्ख्या टीमला घेऊन सिंबा पाहायला पोचला होता. त्यात दीपिकाही होती. नंतर मीडियाशी बोलताना रणवीरला विचारलं, दीपिकाला सिनेमा कसा वाटला? त्यावर रणवीर म्हणाला, माझ्या बायकोला रोहित शेट्टीबरोबर माझाही अभिमान वाटला.

Loading...

रणवीर म्हणाला, की सिनेमा संपल्या संपल्या दीपिकानं रोहितचं अभिनंदन केलं. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर रणवीर सिंबाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाला. त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नव्हते. पण आता दोघंही हनिमूनसाठी रवाना झालेत.

सिद्धार्थ जाधवनं सिंबामध्ये रणवीरसोबत काम केलंय. सिद्धार्थनं रणवीरला विचारलं तू इतका एनर्जिटिक कसा? त्यावर तो म्हणाला, काम हेच माझं पॅशन आहे. सिद्धार्थ म्हणतो, ' नंतर नंतर आमच्या नाईट्स वाढल्या. एक दिवस मी स्वत: रणवीरला पाहिलंय, तो रात्री डान्स करत होता, सकाळी अॅक्शन, संध्याकाळी इमोशनल सिन आणि पुन्हा रात्री डान्स. कोणालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो.'

सिद्धार्थ सांगतो, ' रणवीरला मी अभ्यासू अभिनेता म्हणून पाहिलंय. तो जितका धमाल आहे, तितकाच गंभीरही आहे. त्याला मराठी सिनेमाविषयी माहिती आहे. कलाकारांबद्दलही माहिती आहे. '


Birthday Special : जेव्हा सोनालीच्या मुलाला आईच्या कॅन्सरबद्दल कळलं होतं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 04:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...