व्हिडीओ कॉलवर होती दीपिका, को-स्टारनं रणवीर सिंहला केलं KISS

व्हिडीओ कॉलवर होती दीपिका, को-स्टारनं रणवीर सिंहला केलं KISS

रणवीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. सिनेमा असो किंवा मग कोणताही इव्हेंट रणवीरचा बिनधास्त अंदाज नेहमीच पाहायला मिळाला आहे. सध्या रणवीर सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तो त्याचा आगामी सिनेमा 83 मधील सहकलाकारांसोबत दिसत आहे. यावेळी त्यातील एक कलाकार रणवीरला किस करतो आणि नंतर रणवीच्या लक्षात येतं की दीपिका व्हिडीओ कॉलवर त्याच्याशी बोलत आहे.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रणवीर आणि 83 सिनेमातील इतर कलाकार सुद्धा एका बसमधून कुठेतरी जाताना दिसत आहेत. अशात अचानक रणवीर मध्येच उठून उभा राहतो. यानंतर सर्वजण ओरडू लागतात. या व्हिडीओत मागून आवाज येत आहे की ‘वन.. टू.. थ्री.. गो’ यानंतर रणवीरचा को-स्टार जतिन सरना त्याला किस करण्याचं नाटक करतो. यावेळी पूर्ण बसमध्ये सर्वांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागतो.

PHOTOS : नेहा-आदित्यची बॅचलर पार्टी, इंडियन आयडलच्या सेटवर लगीनघाई

रणवीर सिंह यानंतर म्हणतो की हे खूपच धमकेदार होतं. एवढं प्रेम. यानंतर रणवीर त्याचा फोन घेतो आणि म्हणतो, तुमची वहिनी लाइव्ह आहे, सर्व पाहत आहे. तेव्हा सर्वच सॉरी वहिनी असं बोलताना ऐकू येतं. रणवीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा VIDEO : Love Aaj Kal मधील गाण्याची कॉपी उघड? iPhone कनेक्शन आलं समोर

रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी सिनेमा 83 मुळे फार चर्चेत आहे. या सिनेमाता तो कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झाला. याशिवाय सिनेमाचं मोश पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमात दीपिका रणवीरच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खाननं केलं आहे.

PHOTOS : 'मिसेस मुख्यमंत्री' यांचा हा अंदाज तुम्ही कधीच पाहिला नसेल

First published: February 1, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या