मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'83'चे साथी यशपाल शर्मांच्या आठवणीत कपिल देव भावुक, रणवीर सिंहलाही झाले अश्रू अनावर

'83'चे साथी यशपाल शर्मांच्या आठवणीत कपिल देव भावुक, रणवीर सिंहलाही झाले अश्रू अनावर

 रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) '83' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 23 डिसेंबर - रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) '83' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 24 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे. भारताने 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजचा पराभव करून पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक (World Cup 1983) जिंकला होता. कबीर खान दिग्दर्शित हा चित्रपट भारताच्या याच ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. प्रमोशन दरम्यानच एका टीव्ही शोमध्ये पोहोचलेला 1983 क्रिकेट संघ आपला दिवंगत साथीदार यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांची आठवण करून भावूक झाला.

कपिल देव यशपाल शर्मांच्या आठवणीने भावूक

भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकून क्रिकेटच्या इतिहासात भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. कपिल देव हे या संघाचे कर्णधार होते. पण या विजयासाठी संपूर्ण संघाने जीव ओतला होता. या ऐतिहासिक विजयावर बनलेला '83' हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून या विजया संदर्भात सोशल मीडियावर क्रिकेटच्या विजयाची अभूतपूर्व कथा शेअर केली जात आहे. अभिनेता रणवीर सिंहसह संपूर्ण 183 भारतीय क्रिकेट संघ '83' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीव्ही टुडेच्या मंचावर पोहोचला होता. यावेळी त्या काळातील आठवणी सांगताना कपिल देव यांना रडू कोसळले.

रणवीर सिंहला देखील कोसळले रडू

कपिल देव आपला दिवंगत साथीदार यशपाल शर्मा यांना आठवून आधी भावूक झाले आणि नंतर रडू लागले. हा विजय मिळवण्यात यशपाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावेळी उपस्थित सर्व क्रिकेटरसिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. कपिल यांनी सांगितले की, या शोमध्ये एका व्यक्तीची उणीव जाणवत आहे ज्याने उपांत्य फेरीत इंग्लिश गोलंदाजांचा धुव्वा उडवला होता. '83' चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पडद्यावर दिवंगत क्रिकेटर यशपाल शर्मा यांची भूमिका साकारणारे जतीन सरना आणि चित्रपटाचा मुख्य अभिनेता रणवीर सिंहही बोलत असताना रडले. यावेळी सर्वांनी मौन पाळून त्यांच्या दिवंगत साथीला श्रद्धांजली वाहिली.

या चित्रपटात सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, रवी शास्त्री यांच्या भूमिकेत धैर्य करवा, के श्रीकांत यांच्या भूमिकेत जीवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डी संधू, बलविंदर सिंह यांच्या भूमिकेत एमी विर्क, सैयद किरमानी यांच्या भूमिकत साहिल खट्टर, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे, कीर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा, रॉजर बिन्नी यांच्या भूमिकेत निशांत दहिया. याशिवाय ज्येष्ठ कलाकार पंकज त्रिपाठी टीम मॅनेजर पीआर मान सिंह यांची भूमिका साकारत आहेत. तसेच दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Cricket news, Entertainment, Ranveer sigh