Home /News /entertainment /

Video: रणवीर सिंंगचा Game Show देणार नशीब बदलण्याची संधी, प्रोमो आला समोर

Video: रणवीर सिंंगचा Game Show देणार नशीब बदलण्याची संधी, प्रोमो आला समोर

या महिन्यात जन्माला आलेले लोक कलेच्या क्षेत्रात काम करतात. सिनेमा, मिडिया या क्षेत्रात त्यांनी हात आजमावला तर प्रसिद्धी मिळते. बिजनेसमध्ये यांना यश मिळतं. समाजामध्ये सन्मान प्राप्त करतात.

या महिन्यात जन्माला आलेले लोक कलेच्या क्षेत्रात काम करतात. सिनेमा, मिडिया या क्षेत्रात त्यांनी हात आजमावला तर प्रसिद्धी मिळते. बिजनेसमध्ये यांना यश मिळतं. समाजामध्ये सन्मान प्राप्त करतात.

रणवीर शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. व लोकांना समधून पैसे जिंकण्याची संधी देणार आहे. रणवीरचे चाहते आणि प्रेक्षक या बातमीनंतर फारच उत्सुक पाहायला मिळाले आहेत.

  मुंबई  13 सप्टेंबर : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) लवकरच त्याचा नवा गेम शो ‘द बिग पिक्चर’मधून (The Big Picture) छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी या शोची घोषणा झाली होती. कलर्स चॅनेलवर हा शो दिसणार आहे. दरम्यान रणवीर शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहे. व लोकांना समधून पैसे जिंकण्याची संधी देणार आहे. रणवीरचे चाहते आणि प्रेक्षक या बातमीनंतर फारच उत्सुक पाहायला मिळाले आहेत. लवकरच शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता शोचा प्रोमो समोर आला आहे. त्यात रणवीर त्याच्या खास अंदाजात दिसत आहे, त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याने हा व्हिडीओ शेअर केला होता. तर सुंदर कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे, ‘द बिग पिक्चर, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, घेऊन येत आहे फोटोतून जीवनात उतरवणारा शो, द बिग पिक्चर, खूपच लवकर कलर्स टीव्ही वर.’
  काही वेळापूर्वीच शेअर केलेल्या या प्रोमोला लाखो व्हूज मिळाले आहेत, ज्यावर दोन लाखांहून अधिक व्हूज आले आहेत. यानंतर अनेक चाहत्यांनी त्यावर कमेंट्सही केल्या आहेत. तर शोसाठी उत्सुकताही दाखवत आहेत. कलर्स चॅनल शिवाय हा शो वूटवर देखील दिसणार आहे. रणवीरने एका इंटरव्यू दरम्यान आपल्या टीव्ही डेब्यू विषयी सांगितलं होतं, तो म्हणाला होता, ‘मी अभिनेता म्हणून मला सतत काही ना काही करायचं आहे. मला चित्रपटांतून भरपूर प्रेम मिळालं आहे. मला आता माझा गेम शो ‘द बिग पिक्चर’मधून  लोकांशी जोडायचं आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Ranveer singh

  पुढील बातम्या