VIDEO : पराभवानंतर रणवीरच्या गळ्यात पडून रडला पाकिस्तानी फॅन

अभिनेता रणवीर सिंहने नुकत्याच मँचेस्टर येथे झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 05:54 PM IST

VIDEO : पराभवानंतर रणवीरच्या गळ्यात पडून रडला पाकिस्तानी फॅन

मुंबई, 18 जून : अभिनेता रणवीर सिंहने नुकत्याच मँचेस्टर येथे झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यानं भारतीय संघाला चिअर अप करण्यासोबतच कॉमेन्ट्री सुद्धा केली. त्यानंतर या स्टेडियम वरील रणवीरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एक पाकिस्तानी चाहता पराभवानंतर रणवीरच्या गळ्यात पडून चक्क रडताना दिसत आहे.

Nach baliye 9 : प्रोमोमध्ये उर्वशी ढोलकिया सोबत दिसणारा 'तो' आहे तरी कोण?
भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांमध्ये कमालीची निराशा पाहायाला मिळाली. या पराभवासाठी त्यांनी कर्णधार आणि फलंदाज शोएब मलिकला कारणीभूत ठरवलं. अशातच एका पाकिस्तानी चाहत्याला रणवीरनं मिठी मारुन त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. या पाकिस्तानी चाहत्याचं नाव आतिफ नवाज असं असून तो लंडनमधील एक प्रसिद्ध कॉमेडियन आहे. अतिफनं स्वतःच रणवीरसोबतचा हा व्हिडिओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना आतिफनं लिहिलं, ‘भारतीय चाहते खूप चांगले असतात, धन्यवाद रणवीर सिंह’ या व्हिडिओमध्ये रणवीर सिंह आतिफला, ‘वाईट वाटून घेऊ नकोस. तुमची टीम खूप चांगली खेळली. पुन्हा एकदा संधी मिळेल.’ असं सांगताना दिसत आहे. रणवीरच्या या व्हिडिओचं चाहत्यांकडून खूप कौतुक केलं जात आहे.

International Yoga Day योग करून या 5 अभिनेत्री ठेवतात स्वतःला फिट आणि सेक्सीरणवीरनं या सामन्याच्या वेळी पद्मावतच्या ‘खली बली’ गाण्यावर डान्स केला होता. यावेळी पवेलियनमधील त्याच्या चाहत्यांनी त्याचं व्हिडिओ शूट केलं. याशिवाय सुनील गावस्कार यांच्यासोबत डान्स करतानाचा रणवीरचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता. रणवीर आणि गावस्कर यांनी ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ या गाण्यावर डान्स केला होता. सध्या रणवीर ‘83’ साठी कपिल देव यांच्याकडून ट्रेनिंग घेत आहे. हा सिनेमा 1983च्या वर्ल्डकपमध्ये भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या सिनेमामध्ये दीपिका पदुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. तर कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

पाकिस्तानी क्रिकेट फॅनचं सैफ अली खानशी गैरवर्तन, VIDEO VIRAL
 

View this post on Instagram
 

MASTER BLASTER !!! 🏏🌟@sachintendulkar 😍❤️🙏🏽


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close