VIDEO: रणवीरचं गली बॉय सिनेमाचं गाणं रिलीज, 'मेरी गली में..' VIRAL

VIDEO: रणवीरचं गली बॉय सिनेमाचं गाणं रिलीज, 'मेरी गली में..' VIRAL

रणवीर सिंगच्या आवाजातील मेरी गली में.. गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांना गाण्याचे बोल प्रचंड आवडत आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी 'गली बॉय' चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. चित्रपटाच्या पोस्टरपासून ते ट्रेलरपर्यंत सगळ्याचंच प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. रॅपरच्या जीवनावर आधारित चित्रपट असल्यामुळे कथेबरोबर गाण्यांवर विशेष भर दिला आहे. चित्रपटातील तिसरं गाणं नुकताच रिलीज झालं असून ते सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

मेरी गली में.. हे गाणं पूर्ण रॅपवर अवलंबून आहे. गाण्याचे बोल फार छान आहेत. या गाण्यात रणवीर त्याच्या गलीविषयी असलेल्या खास गोष्टी गाण्यातून सांगत आहे. चित्रपटातील 'मेरी गली में...' हे गाणं डिवाईन आणि नेजी गाण्याचा रिमेक आहे.

चित्रपटातील गाणं रिमेक जरी असलं तरी त्यात बॉलिवूड स्टाईल वापरली असल्याने प्रेक्षकांना ते फार आवडत आहे. या गाण्यामध्ये रणवीर सिंग स्वत: गायला आहे. सर्व रॅपर आणि हिपहॉप प्रेमींना हे गाणं आवडलं म्हणजे रणवीरचा गाण्याचा पहिला वहिला प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही.


सिनेमातील सर्व गाण्यामध्ये रणवीरचा सिंव्हाचा वाटा असून त्याच्या आवाजाची जादू खरतर या सिनेमाच्या निमित्ताने दिसून आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग एका अशा रॅपरची भूमिका साकारणार आहे ज्याच्या जीवनात प्रचंड अडचणी आणि संघर्ष आहे.


येत्या 14 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात रणवीरसोबत सिद्धांत चतुरवेदीसुद्धा रॅप करताना दिसणार आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट, कलकी कोच्चीन, अमृता सुभाष आणि विजय राज हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत आणि चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरने केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 02:39 PM IST

ताज्या बातम्या