रणवीर मिळालेल्या 'या' संधीची अनेक क्रिकेटर पाहतायत वाट, भज्जीनं दिली ही प्रतिक्रिया

रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या '83' हा बायोपिक 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2019 09:53 PM IST

रणवीर मिळालेल्या 'या' संधीची अनेक क्रिकेटर पाहतायत वाट, भज्जीनं दिली ही प्रतिक्रिया

मुंबई, 02 जून :अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी सिनेमा '83' शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग इंग्लंडमध्ये सुरू असून या सिनेमाची संपूर्ण टीम काही दिवसांपूर्वीच इंग्लंडला रवाना झाली आहे. नुकत्याच लॉर्ड्समध्ये इंडिया टुडेनं आयोजित केलेल्या 'सलाम क्रिकेट 2019'मध्ये रणवीरनं हजेरी लावली. यावेळी रणवीरनं स्पिनर हरभजन सिंग आणि पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. सध्या सर्वत्र वर्ल्डकप 2019चा उत्साह असून भारताचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे.

यावेळी बोलताना रणवीर म्हणाला, '83'ची कथा खूपच प्रेरणादायी आहे. त्यावेळी भारताचा संघ असा संघ होता ज्यांना कोणाही गांभीर्यानं घेतलं नव्हतं. या संघाकडून कोणालाही काही खास अपेक्षा नव्हत्या. पण भारतीय संघानं 1983 मध्ये विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटमधील ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या या विजयामुळे भारतातील क्रिकेटचा चेहरा बदलला आणि भारतानं क्रिकेट विश्वात सर्वांना आपली दखल घ्यायला लावली.

मलायकाच्या या हॉट फोटोंवर अर्जुन कपूरने दिली ही कमेंट

रणवीर पुढे म्हणाला, 'आम्ही सध्या इंग्लंडमध्ये या सिनेमाचं शूटिंग करत आहोत आणि मी खूप खूश आहे कारण आम्हाला सकाळी लवकर उठून लॉर्ड्सवर प्रॅक्टिस करायला मिळत आहे.' यावर हरभजन म्हणाला, 'तुम्ही सर्व खूप नशीबवान आहात की, तुम्हाला लॉर्ड्सवर प्रॅक्टिस करायला मिळत आहे कारण ही संधी मोठमोठ्या क्रिकेटर्सनाही मिळलेली नाही. मी म्हटलं तर मलाही या ठिकाणी बॉलिंगची परवानगी मिळणार नाही तु तर कपिल देव आहेस त्यामुळे तुला ही संधी मिळत आहे.'

कडाक्याच्या उन्हामुळे अमिताभ बच्चन यांची झाली 'अशी' अवस्था, म्हणाले...

Loading...


रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या '83' या बायोपिकचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे.

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2019 09:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...