वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट

वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरकडून चाहत्यांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट

आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरनं त्याच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : अभिनेता रणवीर सिंग आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. मागच्या काही काळापासून रणवीर त्याचा आगामी सिनेमा ‘83’मुळे खूप चर्चेत आहे. या सिनमात रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. या सिनेमासाठी रणवीरनं बरीच मेहनत घेतली असून कपिल यांच्या वागण्या-बोलण्यातल्या लकबी शिकण्यासाठी त्यानं बराच काळ कपिल देव यांच्यासोबत घालवला आहे. पण आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं रणवीरनं त्याच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे.

रणवीरनं त्याच्या सोशल मीडियावरून त्याचा ‘83’ सिनेमाचा फर्स्ट लुक त्याच्या चाहत्यांशी शेअर केला आहे. रणवीर त्याच्या फर्स्ट लुकचा फोटो त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करताना, ‘माझ्या आयुष्यातलाया खास दिवशी मी तुमच्यासमोर घेऊन येतोय हरयाणाचं वादळ कपिल देव’ असं कॅप्शन दिलं.

Bottlecapchallenge जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं

‘83’मधील फर्स्ट लुकमध्ये रणवीर हुबेहूब कपिल देव यांच्यासारखाच दिसत आहे. हा सिनेमा 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारतानं साकारलेल्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. या लुकमध्ये रणवीर पांढऱ्या जर्सीमध्ये दिसत असून त्याच्या हातात बॉल आहे. रणवीरचा हा लुक सर्वांच्या पसंतीत उतरला असून सोशल मीडियावर खूप कौतुकही केलं जात आहे.

एमएस धोनीच्या मुलीचे लेटेस्ट फोटो पाहिलेत का?

रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या '83' या बायोपिकचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या सिनेमासाठी कपिल देव यांनी स्वतः रणवीरला क्रिकेटचे धडे दिले आहे. या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. याशिवाय दीपिका पदुकोण या सिनेमात कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटिया यांची व्यक्तिरेखा साकरत आहे. रणवीर आणि दीपिकाचा एकत्र हा चौथा आणि लग्नानंतर पहिलाच सिनेमा आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे.

पहिल्याच भेटीत रणवीरनं केलं होतं असं काही, जे दीपिका अद्याप विसरू शकली नाही

================================================================

SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2019 09:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading