Home /News /entertainment /

दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी रणवीर उधळत होता पैसे, वडिलांनी हिशोब विचारला आणि...

दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी रणवीर उधळत होता पैसे, वडिलांनी हिशोब विचारला आणि...

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखातीत रणवीरनं लग्नाच्या आधी दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी किती मेहनत घेतली याचा खुलासा केला.

  मुंबई, 27 मे : बॉलिवूडचं क्यूट कपल म्हणून ओळखले जाणारे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची केमिस्ट्री तर सर्वांनाच आवडते. एकमेकांना 6 वर्ष डेट केल्यानंतर हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. मात्र त्यांच्या लव्हस्टोरी चर्चा अद्याप होताना दिसते. काही दिवसांपूर्वी फुटबॉलपटू सुनील छेत्रीला दिलेल्या मुलाखातीत रणवीरनं त्याच्या लव्हस्टोरीचे अनेक किस्से शेअर केले. यावेळी त्यानं लग्नाच्या आधी दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी किती मेहनत घेतली याचा खुलासा केला. लग्नाच्या आधीही रणवीरचं दीपिकावर असेलेलं प्रेम कोणापासून लपून राहिलेलं नाही. त्याला अनेक पार्ट्यांमध्ये दीपिकासाठी फुलं घेऊन गेलेलं अनेकांनी पाहिलं आहे. या मुलाखतीत रणवीरनं या फुलांशी निगडीत एक मजेदार किस्सा शेअर केला. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण यांची लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती ती रामलीलाच्या सेटवर. सुनील छेत्रीनं त्याच्या लाइव्ह चॅटमध्ये रणवीरनं दीपिकासाठी लग्नाआधी काय काय केलं असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर देताना रणवीरनं एक खूपच मजेदार किस्सा सांगितला.
  View this post on Instagram

  ❤️

  A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

  रणवीरनं सांगितलं की, दीपिकाला भेटल्यानंतर 6 महिन्यातच मी ठरवलं होतं की हिच्याशीच लग्न करायचं. पण दीपिकाला इम्प्रेस करणं एवढं सोपं नव्हतं. जेव्हाही मी तिला भेटायला जात असे त्यावेळी मी तिच्यासाठी फुलं घेऊन जाणं कधीच विसरत नसे. आम्ही अनेकदा एखादा तास किंवा काही मिनिटांसाठी भेटत असू. मी त्या छोट्याशा भेटीच्या वेळी सुद्धा तिच्यासाठी लिलीची फुलं घेऊन जात असे. कारण मला माहित होतं की दीपिकाला लिली खूप आवडते. रणवीर पुढे म्हणाला, मी जो पैसा या फुलांवर उधळत होतो. त्या बद्दल माझ्या बाबांना माहित होतं एकदा त्यांनी मला विचारलं, तुला कल्पना आहे की तू फुलांवर किती पैसे खर्च करत आहेस. त्यावर मी त्यांना म्हणालो, बाबा तुम्ही काळजी करू नका लक्ष्मीच्या अवतारात ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत.
  रणवीरनं या मुलाखतीत सांगितलं की, त्यावेळी दीपिकाला इम्प्रेस करण्यासाठी मला खूप छान जेवण बनवता येतं आणि मी तुला जेवण बनवून खाऊ घालेण असंही सांगितलं होतं. पण यासोबतच त्यानं या मुलाखतीत कबुली सुद्धा दिली की, त्याला स्वतःला अंडा-ब्रेड व्यतिरिक्त काहीच बनवता येत नाही.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Deepika padukone, Ranveer singh

  पुढील बातम्या