Wedding Anniversary : दिग्दर्शकानं कट म्हटल्यावरही KISS करत राहिले दीपवीर, अशी सुरू झाली होती Lovestory

Wedding Anniversary : दिग्दर्शकानं कट म्हटल्यावरही KISS करत राहिले दीपवीर, अशी सुरू झाली होती Lovestory

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मागच्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मागच्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे हे दोघंही लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या या शाही डेस्टीनेशन वेडिंगची सोशल मीडियावर खूप चर्चाही झाली. हे दोघंही पहिल्यांदा संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’मध्ये एकत्र दिसले आणि याच ठिकाणी त्याच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. जाणून घेऊयात त्याच्या लव्हस्टोरी बद्दल काही रंजक गोष्टी. ज्या त्यावेळी या सिनेमाच्या सेटवर असलेल्या क्रू-मेंबरनं शेअर केल्या.

दीपिका- रणवीरच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्री पेक्षा त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. रणवीरनं दीपिकाला पहिल्यांदा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पाहिलं होतं. पण या दोघांना पहिल्यांदा एकत्र आणलं ते दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी. 2013 मध्ये आलेल्या ‘रामलीला’मध्ये हे दोघं प्रमुख भूमिकेत दिसले आणि याच ठिकाणी त्यांच्यात जवळीक वाढायला सुरुवात झाली होती. या सिनेमात अनेक रोमँटिक सीन आहेत. असं सांगितलं जातं की या सीनमध्ये हे दोघं अशाप्रकारे दंग होत असतं की दिग्दर्शकानं कट म्हटल्यावरही ते यातून बाहेर पडत नसत.

अमिर खानच्या मुलीचं HOT फोटोशूट, पहा इराचा BOLD अंदाज

 

View this post on Instagram

 

No caption needed 😉 @deepikapadukone #RamLeela

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

या सिनेमाच्या सेटवरील क्रू-मेंबरनं सांगितलं, ‘आम्हाला सर्वांनाच वाटायचं की या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी सुरु आहे. ही गोष्ट सिनेमातील गाणं ‘अंग लगा दे रे'च्या शूटिंग वेळची आहे. त्यावेळी हे दोघं प्रेमात असल्याचं कन्फर्म झालं. या गाण्यातील एक किसिंग सीन खूपच पॅशनेट होता. मी तो सीन अजिबात विसरू शकत नाही. रणवीर आणि दीपिकाचा हा किसिंग सीन शूट होत होता. दिग्दर्शकांनी कट म्हटलं पण हे दोघं एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी सर्वांना समजलं हे दोघं प्रेमात आहेत.’

VIDEO : तरुणीने बाहुबलीच्या गालात मारली 'थप्पड', त्यानंतर नेमकं काय घडलं...

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

दीपिका आणि रणवीर एकत्र येण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. कारण या दोघांनी भन्साळीच्या 1 नाही तर 3 सिनेमात काम केलं. ज्यात गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या सिनेमांचा समावेश होतो. त्यानंतर आता हे दोघं कबीर खानच्या 83 सिनेमात एकत्र दिसणार आहेत. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी रणवीर-दीपिका कालच तिरूपतीला रवाना झाले. त्यामुळे हे दोघं कोणतंही ग्रँड सेलिब्रेशन करण्याच्या विचारात आहेत असं दिसतंय सेलिब्रेशनचं स्वरुप खासगी आणि कौटुंबीक असण्याची शक्यता आहे. आज दीपवीर कुटुंबासोबत तिरुपती बालादजी आणि पद्मापतिचं दर्शन घेतील.

भोजपुरी की क्वीन पाखी हेगडेच्या आयटम डान्सचा Video व्हायरल

======================================================================

इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE

Published by: Megha Jethe
First published: November 14, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading