मुंबई, 2 जून : सारा अली खान आणि कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या आगामी सिनेमामुळे खूप चर्चेत आहेत. नुकतंच सारा आणि कार्तिकनं या सिनमाचं शूटिंग पूर्ण केलं. यानंतर सोशल मीडिया अकाउंटवर सारानं काही फोटो पोस्ट केले. यात ती कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सारानं तिला कार्तिकची खूप आठवण येईल असं लिहिलं आहे. साराच्या या फोटोवर बॉलिवूड चाहत्यांसोबतच सेलिब्रेटींच्याची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे सारा कार्तिकच्या अफेअर्सच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. तसेच या दोघांची पहिली भेट कोणी घडवून आणली हे देखील आता या कमेंटच्या माध्यमातून समोर आलं आहे.
पावसामुळे मुंबईची दैना, अमिताभ बच्चन यांनी घेतली पालिकेची फिरकी!
सारानं या सिनेमाच्या रॅपचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंहने सुद्धा कमेंट केली आहे. रणवीरनं लिहिलं, ‘खूप छान, पण पहिल्यांदा कोणामुळे भेटलात हे विसरु नका.’ सारानं एका मुलाखतीत कार्तिक आर्यनला डेट करायची इच्छा बोलून दाखवली होती. त्यावेळी ती रणवीरसोबत सिंबाचं शूट करत होती आणि त्यानंतर काही दिवसांनी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये कार्तिक आणि साराची भेट घडवून आणली होती. त्यावेळचा त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर सारा-कार्तिकला इम्तियाज अली यांनी त्यांच्या आगामी सिनेमासाठी साइन केलं होतं.
मुस्लीम असणं सध्या खूपच भीतीदायक, पाकिस्तानी हॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य
याशिवाय कार्तिकनं या फोटोंवर, 'मी तुझ्या या पोस्टमधील माझ्यासाठी जे लिहिलं आहे ते किती वेळा वाचलं आहे याची तुला कल्पनाही नसेल.' अशी कमेंट करत हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे. इम्तियाज अली यांच्या सिनेमाच्या निमित्तानं सारा आणि कार्तिकमधील जवळीक वाढलेली दिसली. अनेकदा ते दोघं एकत्र फिरताना दिसले.
स्वतःचे न्यूड फोटो आणि MMS व्हिडिओ लीक करते 'ही' अभिनेत्री
सारानं रॅपचे काही फोटो तिच्या इस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, सिनेमाच्या शूटच्यावेळी मला दडपण जाणवू न देण्यासाठी धन्यवाद कार्तिक. कोणत्याही स्वार्थाशिवाय मला खूप काही दिल्याबद्दल आणि माझी काळजी घेण्यासाठी धन्यवाद. तुझ्यासोबत कॉफीपासून चहापर्यंत, मला अशा करते की, आपण हे सर्व पुन्हा करू शकू. मी तुला खूप मिस करेन. जेवढं तू विचारही करू शकत नाही.
सारानं इम्तियाज अली यांच्यासोबत काम करण्याबाबत लिहिलं, सिनेमाचं शूट संपलं. 66 दिवस आणि अनेक आठवणी. माझं स्वप्न साकार केल्याबाबत धन्यवाद. ज्या प्रकारे तुम्ही माझी काळजी घेतली. ही गोष्ट मला खूप आवडली. तुमच्या सेटवरील मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला. या सर्व गोष्टी मी खूप मिस करणार आहे.