अन् टीव्हीवर पहिल्यांदा ढसाढसा रडला रणवीर सिंग

अन् टीव्हीवर पहिल्यांदा ढसाढसा रडला रणवीर सिंग

तो संपूर्ण परफॉर्मन्समध्ये फक्त रडत होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नव्हते.

  • Share this:

मुंबई, ११ फेब्रुवारी २०१९- बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याला तुम्ही सकाळी ज्या उत्साहात पाहाल त्याच उत्साहात तो संध्याकाळीही असतो. त्याच्यातला उत्साह तसूभरही कमी झालेला नसतो. अशात जर आम्ही तुम्हाला सांगितलं की एका कार्यक्रमात रणवीर ढसाढसा रडला तर?

सुपर डांसर चॅप्टर३ या रिअलिटी शोमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग आपल्या आगामी गली बॉय सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेले होते. या शोमध्ये स्पर्धक गौरव आणि त्याचे प्रशिक्षक अमरदीप यांनी रणवीरच्या आयुष्यावर आधारित एक डान्स परफॉर्मन्स केला. यात रणवीरच्या स्ट्रगलपासून ते खासगी आयुष्यातील उतार- चढावापर्यंतच्या सर्व गोष्टी दाखवल्या.


या खास परफॉर्मन्सने रणवीर फार भावुक झाला आणि ढसाढसा रडू लागला. तो संपूर्ण परफॉर्मन्समध्ये फक्त रडत होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबत नव्हते. भावुक रणवीर आतापर्यंत कोणी पाहिला नव्हता.

या परफॉर्मन्सबद्दल बोलताना रणवीर म्हणाला की, ‘मी कधीच विचार केला नव्हता की कोणत्या डान्स शोमध्ये जाईन आणि तिथे माझ्या आयुष्यावर एखादा परफॉर्मन्स होईल. तुम्ही माझ्यासाठी घेतलेले कष्ट पाहून मी फार भावुक झालोय. वेळ बदलली आहे. गेल्या वर्षी मी दोन सिनेमांत काम केलं, लग्न केलं.. या सगळ्याकडे मागे वळून पाहताना मला वाटतं की हे एखादं स्वप्न आहे. मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. हा परफॉर्मन्स हृदयस्पर्शी होता.’

शोचे सर्व परीक्षकही रणवीरला रडताना पाहून आश्चर्यचकीत झाले. शोमध्ये फक्त रणवीरच नाही तर शिल्पा शेट्टीही भावुक झाली होती.

VIDEO : स्वित्झर्लंड नव्हे, हे आहे आपलं शिमला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या