Birthday Special: असं काय झालं की भर मुलाखतीत आईचे शब्द आठवून रडला रणवीर, VIDEO व्हायरल

Birthday Special: असं काय झालं की भर मुलाखतीत आईचे शब्द आठवून रडला रणवीर, VIDEO व्हायरल

अभिनेता रणवीर सिंहची नेहमी आनंदी, उत्साही, Energetic कलाकार अशी ओळख आहे. मात्र रणवीर काहीसा हळवा देखील आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. त्याचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै :  आज अभिनेता रणवीर सिंह त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधून, त्याच्या चाहत्यांकडून आणि कुटुंबीयांकडून रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहमी आनंदी, उत्साही, Energetic असणारा रणवीर काहीसा हळवा देखील आहे हे फार कमी लोकांना माहित आहे. त्याचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील सर्वात Energetic आणि उत्साही कलाकार म्हणून अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)ची ओळख आहे. मग त्याच्या सिनेमाचा सेट असो, पत्रकार परिषद असो किंवा एखादा पुरस्कार सोहळा. या सर्वच ठिकाणी त्याच्याइतकं उत्साही कुणीचं नसतं. रणवीर त्याच्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. दरम्यान रणवीर सिंहचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा रणवीरने बॉलिवूडमध्ये त्याची नवीन नवीन ओळख बनवली होती. त्याचे फॅन्स वाढू लागले होते आणि त्यांचा सपोर्ट देखील त्याला मिळत होता.या व्हिडीओमध्ये रणवीरची एक वेगळी बाजू पाहायला मिळते.

(हे वाचा-सुशांतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर आज येणार, OTT वर प्रदर्शित होणार सिनेमा)

एका मुलाखती दरम्यान चक्क रणवीरला रडू कोसळलं आहे आणि ते पाहून त्या मुलाखतीची अँकर असणारी अभिनेत्री सिमी गरेवाल हिने देखील त्याची माफी मागतली आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरच्या आईने त्याच्याबाबत अशा काही गोष्टी सांगितल्या की रणवीर त्याचं रडू आवरू शकला नाही.

या मुलाखतीमध्ये रणवीरने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि कामाबद्दल खूप गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यावेळी त्याला सरप्राइज देण्यासाठी त्याच्या आईचा एक व्हिडीओ मुलाखती दरम्यान लावण्यात आला. त्यावेळी त्याच्या आईने रणवीरच्या खडतर काळाबाबत सांगितले. त्याची आई म्हणाली की 'सुरूवातीच्या काळात जेव्हा तो घरी परतायचा तेव्हा केवळ इतकंच बोलायचा की, दिवस खराब गेला. पण आई असल्यामुळे मला तो किती अस्वस्थ आहे ते कळायचे. आम्ही देखील दु:खी होऊ नये याकरता त्याने कधी काहीच सांगितले नाही. पण जेव्हा तो यशस्वी झाला त्यानंतर त्याने त्याच्या कष्टांबद्दल सर्वांना सांगितले. आता त्याची कहाणी ऐकून कळते की तो इतक्या उंचीवर केवढा संघर्ष करून पोहोचला आहे.'

(हे वाचा-सोनाली बेंद्रेचे Throwback फोटो, बिकिनी लुकमुळे अभिनेत्री चर्चत)

आईच्या या शब्दांमुळे रणवीरचा बांध फुटला आणि अचानकच त्याच्या डोळ्यात पाणी आले. 2010 मध्ये बँड बाजा बारात मधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणाऱ्या रणवीरने आजपर्यंत अनेक यशस्वी आणि 100  कोटींच्या घरातले चित्रपट दिले आहेत.

संपादन - जान्हवी भाटकर

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 6, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading