पहिल्याच भेटीत रणवीरनं केलं होतं असं काही, जे दीपिका अद्याप विसरू शकली नाही

पहिल्याच भेटीत रणवीरनं केलं होतं असं काही, जे दीपिका अद्याप विसरू शकली नाही

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लव्हस्टोरी खरंतर एखाद्या सिनेमाच्या स्क्रीप्टपेक्षा कमी नाही.

  • Share this:

मुंबई, 6 जून : बॉलिवूडमध्ये नाती जुळायला आणि तुटायला वेळ लागत नाही. मात्र काही अशा लव्ह स्टोरी असतात ज्या कायमच्या एकमेकांची सोबत बनतात. अशीच एक लव्ह स्टोरी आहे बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात रणवीर-दीपिकाची. रणवीर सिंग उद्या त्याचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊयात रणवीर-दीपिकाच्या लव्हस्टोरीची सुरुवात नेमकी कशी झाली. या दोघांची लव्हस्टोरी खरंतर एखाद्या सिनेमाच्या स्क्रीप्टपेक्षा कमी नाही. लग्नाच्या नंतरही रणवीर दीपिकाच्या प्रेमात अजिबात फरक पडला नाही. हे दोघं लग्नाच्या नंतरही सोशल मीडिया किंवा इतर कुठेही एकमेकांबाबत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

दीपिका पदुकोणनं स्वतःच एक मुलाखतीत रणसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला होता. यावेळी दीपिका म्हणाली, ‘आम्ही पहिल्यांदा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये भेटलो होतो. त्यानंतर एक दिवस मी यशराज स्टुडिओमध्ये शूटिंग करत होते. त्यावेळी तिथे रणवीरही आला होता. तो माझ्याशी फ्लर्ट करत होता. त्याचवेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. तरीही माझ्यासोबत फ्लर्ट करत होता. शेवटी न राहावून मी त्याला विचारलं, तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस का? त्यावर तो म्हणाला अजिबात नाही. त्यानंतर मी त्याला ठामपणे म्हणाले तू माझ्याशी फ्लर्ट करत आहेस.’

Bottlecapchallenge जे बॉलिवूडकरांना जमलं नाही ते स्वप्नील- अमृताने करून दाखवलं

View this post on Instagram

❤️

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका म्हणाली, ‘त्यानंतर आम्ही भन्साळींच्या घरी भेटलो. रामलीला सिनेमाच्या वेळी भन्साळींनी आम्हाला लंचसाठी बोलवलं होतं. त्यावेळी आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. तो असा वेळ होता जेव्हा मला रणवीर खूप स्पेशल वाटू लागला होता.’ रामलीला नंतर दीपवीर बऱ्याच सिनेमांमध्ये एकत्र दिसले. रणवीरनं तर अनेकदा ते दोघं भन्साळींमुळे एकत्र आले असं कबुल केलं आहे. या दोघांनीही एकमेकांना 6 वर्ष डेट केलं होतं त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

कियारा अडवाणी की तारा सुतारिया, सिद्धार्थ मल्होत्रा नक्की कोणाला करतोय डेट?

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

बराच काळ हे नातं सर्वांपासून लपवून ठेवल्यानंतर रणवीर आणि दीपिकानं मागील वर्षी म्हणजेच 14 नोव्हेंबर 2018 ला लग्न केलं. लग्नानंतर हे दोघं आता ‘83’ या बायोपिकमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ज्यात रणवीर माजी क्रिकेटर कपिल देव तर यांची भूमिका तर दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

प्रभासच्या Saaho मध्ये सलमान खानची फेवरेट अभिनेत्री करणार आयटम साँग

======================================================================

SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!

First published: July 6, 2019, 7:11 AM IST

ताज्या बातम्या