तीन दिवसांत 'सिंबा'नं केली 'इतकी' कमाई, 100 कोटींकडे घोडदौड

सिंबाचा बोलबाला खूप झाला. त्याप्रमाणे प्रेक्षकांनीही सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिलाय. तीन दिवसात सिंबानं बाॅक्स आॅफिसवर दणदणीत कमाई केली.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 07:17 PM IST

तीन दिवसांत 'सिंबा'नं केली 'इतकी' कमाई, 100 कोटींकडे घोडदौड

मुंबई, 31 डिसेंबर : सिंबाचा बोलबाला खूप झाला. त्याप्रमाणे प्रेक्षकांनीही सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिलाय. तीन दिवसात सिंबानं बाॅक्स आॅफिसवर दणदणीत कमाई केली.

शुक्रवारी सिनेमा रिलीज झाला. रविवारी सिनेमानं 31.06 कोटी कमाई केलीय. आतापर्यंत सिनेमानं 75.11 कोटी कमाई केलीय. बाॅक्स आॅफिसवर पहिल्या दोन दिवसात 44 कोटींचा गल्ला जमवलाय. सिनेमानं परदेशातही दोन दिवसात 24.22 कोटी मिळवलेत.
Loading...या वेगानं हा सिनेमा लवकरच 100 कोटींच्या घरात जाईल, याची खात्री ट्रेड अॅनॅलिस्टना आहे.

रणवीर सिंग आपल्या अख्ख्या टीमला घेऊन सिंबा पाहायला पोचला होता. त्यात दीपिकाही होती. नंतर मीडियाशी बोलताना रणवीरला विचारलं, दीपिकाला सिनेमा कसा वाटला? त्यावर रणवीर म्हणाला, माझ्या बायकोला रोहित शेट्टीबरोबर माझाही अभिमान वाटला.

रणवीर म्हणाला, की सिनेमा संपल्या संपल्या दीपिकानं रोहितचं अभिनंदन केलं. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर रणवीर सिंबाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाला. त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नाहीत.


Year Ender 2018 : 'लागीरं झालं जी'च्या अज्यानं अनेकांना नाचवलंय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...