दीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

दीपवीरच्या लग्नाचे VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

लग्नाचे काही फोटोज लीक होतायत. पण काही व्हिडिओजही बाहेर आलेत.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : रणवीर सिंग-दीपिका यांचं लग्न झालं. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर सरतेशेवटी दोघांनी दोनाचे चार हात केले. दीपिकाचं काल ( 14 नोव्हेंबर ) कोकणी पद्धतीनं लग्न झालं. तर रणवीर सिंग सिंधी असल्यानं आज (15 नोव्हेंबर) सिंधी पद्धतीनं लग्न झालं. लग्नाचे काही फोटोज लीक होतायत. पण काही व्हिडिओजही बाहेर आलेत.

या व्हिडिओजमध्ये रणवीर आणि दीपिका लग्नाच्या ठिकाणी जाताना दिसतायत. ते दोघं बोटीनं जातायत. त्यांच्या मागे त्यांचं कुटुंबही दिसतंय. रणवीर पांढऱ्या पोशाखात आहे, तर दीपिका आॅरेंज रंगाच्या साडीत दिसतेय. दोघांच्या डोक्यावर काळ्या रंगाची छत्री दिसतेय. हा व्हिडिओ खूप लांबून शूट झालाय.

View this post on Instagram

Guests at #deepveerkishaadi

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

असं कळतंय की,आता थोडाच वेळ वाट पाहायला लागणार आहे. लग्नाचा आॅफिशियल फोटो संध्याकाळी 6 वाजता शेअर केला जाणार आहे.

मिड डेच्या बातमीनुसार दीपवीर आपल्या फॅन्सना एक शुभ संदेश देणार आहेत. त्याबरोबर फोटोही शेअर होईल. विशाल पंजाबी या लग्नाचा आॅफिशियल फोटोग्राफर आहे. तो सगळे फोटो काढतोय. अगोदरच ठरलं होतं की सिंधी पद्धतीनं लग्न झालं की फोटो शेअर केले जातील.

View this post on Instagram

#deepveerkishaadi

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

गेले आठवडाभर 12 फुलवाले दीपिकाच्या आवडत्या फुलांची सजावट करतायत. लीली आणि पांढऱ्या गुलाबांची सजावट केली जातेय. आतापर्यंत 8 हजार फुलं वापरली गेलीयत.

दीपिकाची मेहंदी काढायला दीप्ती बेन मारू या मेहंदी आर्टिस्टला इटलीला बोलावून घेतलं. दीप्ती मुंबईच्या नालासोपारा इथे राहते. 11 नोव्हेंबरला ती इटलीला पोचली.

दीप्तीनं फक्त दीपिकाला नाही तर रणवीरलाही मेहंदी काढली आहे. आता अनुष्का-विराटप्रमाणे दीपवीर आपले फोटोज कधी ट्विट करतायत, याची सगळे जण वाट पहातायत.

First published: November 15, 2018, 4:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading