DeepVeer : इटलीतला लग्नाच्या ठिकाणाचा पहिला Photo व्हायरल

DeepVeer : इटलीतला लग्नाच्या ठिकाणाचा पहिला Photo व्हायरल

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. सांगितलं जातंय की तो लेक कोमोचा आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : दीपिका-रणवीर सिंग इटलीला पोचलेत. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.


सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. सांगितलं जातंय की तो लेक कोमोचा आहे. जिथे दीपिका-रणवीरचं लग्न होणार आहे, तिथला हा फोटो आहे. लांबवरचा शाॅट आहे. लांबूनच थोडी सजावटही दिसतेय.दीपिका साऊथ इंडियन आणि रणवीर सिंधी. दोघांच्या पद्धतीनं लग्न होणार आहे. 14 नोव्हेंबरला दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न होईल, तर 15 नोव्हेंबरला सिंधी पद्धतीनं लग्न होणार आहे. त्याआधी 13 नोव्हेंबरला संगीत आहे. इटलीच्या लेक कोमोत लग्नाचा हा सोहळा रंगणार आहे.


लेक कोमो हा इटलीतील सर्वात मोठा तलाव आहे. एवढेच नाही तर जगातील सर्वात खोल तलावांपैकी लेक कोमो हा एक तलाव आहे. रोमन काळापासून श्रीमंत लोकांचे लेक कोमो हे सर्वात आवडीचं स्थळ राहिलं आहे.


इथल्या वास्तू या खास आर्टिस्टिक पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत. इथे व्हिला ओलमो, व्हिला सेरबेलोनी आणि व्हिला कारलोटोसारखे जग प्रसिद्ध पॅलेस आहेत. या फोटोमध्ये तुम्ही लेक कोमो येथील ग्रॅण्ड हॉटेल पाहू शकता.


२०१४ मध्ये द हफिंग्टन पोस्टने लेक कोमोला आलिशान व्हिला आणि सुंदर गावांमुळे या जागेला जगातील सर्वात सुंदर तलावांमध्ये समाविष्ट करुन घेतले होते. लेक कोमोजवळ लेको, वारेना, मेनाजियो, कोमो आणि बेलाजिया ही पाच मुख्य शहर आहेत.


रिसेप्शननंतर दोघं मुंबईला परतणार आहेत. रणवीर आपल्‍या नव्‍या घराच्‍या शोधात आहे. नवे घर मिळेपर्यंत रणवीर आणि दीपिका हे दोघं दीपिकाच्‍या घरी राहणार आहे. दीपिकाचं एक घर मुंबईमध्‍ये आहे, जेथे ते दोघे आपला संसार मांडणार आहेत. दीपिकाचं घर मुंबईतील प्रभादेवी अपार्टमेंटमध्‍ये आहे.


विमानतळावर बाॅलिवूडचे शहेनशहा आणि बादशहा कॅमेऱ्यात कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2018 04:31 PM IST

ताज्या बातम्या