मुंबई, 16 जानेवारी: बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी दीपिका पादुकोण(Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh )सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दोघंही त्यांचा हटके अंदाज, फॅशनमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतात. या दोघांचे एअरपोर्ट लुक देखील अनेकदा व्हायरल होतात. दरम्यान काल रात्री दोघे पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. मुंबई एअरपोर्टवरील त्यांचा क्यूट व्हिडीओ सध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाने लो-कट टॉपसह लाँग पँट परिधान केली आहे. तर रणवीर कॅजुअल लुकमध्ये दिसला. दोघांनीही ब्लॅक कलरचे ग्लासेस परिधान केले होते. दीपिकाने व्हॉईट श्यूज तर रणवीरने ब्रॉऊन कलरचे श्यूज परिधान करत आपला लुक कंप्लीट केला आहे.
त्यांचा हा व्हिडीओ विरल भयानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. 32 हजारपेक्षा अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. तर काही चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्याबद्दल असलेले प्रेम व्यक्त केले आहे.
राणि आणि तिचा राजा, अशी कमेंट एका युजरने केली आहेत तर दुसऱ्या एका युजरने सर्वांत सुंदर जोडी असे म्हटले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नविन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी दोघेही मुंबई बाहेर गेले होते. या क्यूट कपलने व्हॅकेशन दरम्यानची काही फोटो सोशल मीडीवर पोस्ट केली आहेत.
दीपवीर जोडी 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. कपने मागिल वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाचा तीसरा वाढदिवस साजरा केला. ‘जयेशभाई जोरदार’, ‘सर्कस’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हे रणवीरचे आगामी चित्रपट आहेत.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.