S M L

इटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

रणवीर-दीपिकाच्या डोक्यावर अक्षता तर पडल्या. कोकणी पद्धतीनं आज लग्न झालं. उद्या सिंधी पद्धतीनं लग्न होणार आहे.

Updated On: Nov 14, 2018 05:37 PM IST

इटलीतल्या दीपवीरच्या रिसाॅर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल

मुंबई, 14 नोव्हेंबर : रणवीर-दीपिकाच्या डोक्यावर अक्षता तर पडल्या. कोकणी पद्धतीनं आज लग्न झालं. उद्या सिंधी पद्धतीनं लग्न होणार आहे. ते ज्या रिसाॅर्टमध्ये उतरलेत तिथले फोटो शेअर झालेत.


अशी माहिती कळली आहे की लग्न सोहळ्याला शाहरुख खान, फराह खान आणि संजय लीला भन्साळी उपस्थित होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार या रिसाॅर्टमध्ये दोघं उतरलेत, त्याला 75 रुम्स आहेत. 4 रेस्तराँ आणि बार आहेत. शिवाय 4 कान्फरन्स रूम्स, एक स्पा, इनडोर स्विमिंग पूलही आहे.



एका रूमची किंमत 400 युरो म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे 33 हजार आहे. या हाॅटेलमध्ये दिवसभर राहायचं असेल तर 24 लाख 75 हजार रुपये मोजावे लागतील. तर पूर्ण आठवडाभरासाठी याची किंमत आहे 1 कोटी 73 लाख 25 हजार रुपये.


Loading...





ज्या ठिकाणी लग्न झालं, तिथून हाॅटेलमध्ये पोचण्यासाठी 45 मिनिटं लागतात. तिथे बोटीनंही जाता येतं 17 नोव्हेंबरपर्यंत हे रिसाॅर्ट बुक आहे.


काल ( 13 नोव्हेंबर ) रात्री संगीत सोहळा पार पडला. त्यावेळी रणवीर आणि दीपिकानं जोरदार डान्स केलाय. आता सगळे वाट पाहतायत ते  या डान्स व्हिडिओची. तो अजून बाहेर आलेला नाही. यावेळी कुटुंबातले लोक, मित्रमंडळी यांनी अक्षरश: जल्लोष केल्याची माहितीही समोर आलीय.


लग्नाच्या वेळी बाॅलिवूडचं कुणी उपस्थित नाहीय. म्हणजे दीपिका-रणवीर सोडून. लग्नासाठी फक्त घरातले आणि जवळचे फ्रेंड्स आहेत. सोमवारी रणवीर-दीपिकानं एकमेकांना अंगठीही घातली आणि औपचारिक साखरपुडा केला.


डिनर झाल्यानंतर सगळ्यांनी तुफान डान्स केला. रणवीरचे वडील जास्त खूश दिसत होते. रणवीर काळ्या सुटमध्ये होता. बाॅलिवूडची ही हाॅट जोडी खूप खूश दिसत होती.


कृपया पुष्पगुच्छ वा आहेर आणू नयेत ही विनंती.. हा मजकूर तुम्ही लग्नाच्या पत्रिकेवर पाहिला असेल.असंच काहीसं म्हणत आहेत बॉलिवूडची लग्नाळू जोडी रणवीर -दीपिका. लग्नाला भेटवस्तू न स्वीकारता ही भेट डोनेशनच्या रूपात 'लिव्ह लव्ह लाफ' या दीपिका पदुकोणच्या फाऊंडेशनला द्यावी अशी विनंती दीपिका-रणवीर यांनी लग्नपत्रिकेवर केली आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 05:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close