S M L

दीपिका आणि रणवीर यांचा श्रीलंकेत साखरपुडा?

5 जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस आहे. याच दिवशी हे दोघेही श्रीलंकेमध्ये साखरपुडा करणार असल्याचं समजतंय.

Sachin Salve | Updated On: Jan 4, 2018 12:49 PM IST

दीपिका आणि रणवीर यांचा श्रीलंकेत साखरपुडा?

04 जानेवारी : विराट आणि अनुष्काचं लग्न तर झालं आता बॉलिवूडची आणखी एक जोडी लग्नाच्या तयारी आहे असं दिसतंय. अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंगच्या लग्नाच्या चर्चा सध्या चांगल्याच गाजतायत. 5 जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस आहे. याच दिवशी हे दोघेही श्रीलंकेमध्ये साखरपुडा करणार असल्याचं समजतंय.

खरं तर एका जाहिरातीसाठी रणवीर श्रीलंकेला गेला होता. त्याच्यामागे दीपिकाही श्रीलंकेत पोहचली आणि दोघांनी एकत्रच नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्यामुळे आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विराट अनुष्काच्या लग्नासारखं सगळ्यांना सरप्राईज देण्याचा कदाचित यांचाही प्लान असावा. जर खरंच ते दोघेही लग्न करणार असतील तर उरला फक्त आजचा दिवस. उद्या हे दोघेही विवाह बंधनात अडकतील. या लग्नाच्या अफवांमुळे दीपिका आणि रणवीरच्या चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे. तसं दीपिका आणि रणवीरबरोबरच 2018मध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्याही लग्नाच्या चर्चा आहेत. त्यामुळे कोणाच्या लग्नाचे सनई-चौघडे आधी वाजणार हेच बघणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2018 12:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close