News18 Lokmat

इंतजार संपला, लवकरच मिळणार दीपवीरच्या फॅन्सना लग्नाची भेट

विशाल पंजाबी या लग्नाचा आॅफिशियल फोटोग्राफर आहे. तो सगळे फोटो काढतोय. अगोदरच ठरलं होतं की सिंधी पद्धतीनं लग्न झालं की फोटो शेअर केले जातील.

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 01:13 PM IST

इंतजार संपला, लवकरच मिळणार दीपवीरच्या फॅन्सना लग्नाची भेट

मुंबई, 15 नोव्हेंबर : काल ( 14 नोव्हेंबर ) दीपिका-रणवीरचं लग्न कोकणी पद्धतीनं झालं. आज ते सिंधी पद्धतीनं लग्न करतायत. फॅन्सना वधूवर कसे दिसतायत याची खूपच उत्सुकता आहे. आता थोडाच वेळ वाट पाहायला लागणार आहे. लग्नाचा आॅफिशियल फोटो संध्याकाळी 6 वाजता शेअर केला जाणार आहे.


मिड डेच्या बातमीनुसार दीपवीर आपल्या फॅन्सना एक शुभ संदेश देणार आहेत. त्याबरोबर फोटोही शेअर होईल. विशाल पंजाबी या लग्नाचा आॅफिशियल फोटोग्राफर आहे. तो सगळे फोटो काढतोय. अगोदरच ठरलं होतं की सिंधी पद्धतीनं लग्न झालं की फोटो शेअर केले जातील.


गेले आठवडाभर 12 फुलवाले दीपिकाच्या आवडत्या फुलांची सजावट करतायत. लीली आणि पांढऱ्या गुलाबांची सजावट केली जातेय. आतापर्यंत 8 हजार फुलं वापरली गेलीयत.

Loading...


दीपिकाची मेहंदी काढायला दीप्ती बेन मारू या मेहंदी आर्टिस्टला इटलीला बोलावून घेतलं. दीप्ती मुंबईच्या नालासोपारा इथे राहते. 11 नोव्हेंबरला ती इटलीला पोचली.


दीप्तीनं फक्त दीपिकाला नाही तर रणवीरलाही मेहंदी काढली आहे. आता अनुष्का-विराटप्रमाणे दीपवीर आपले फोटोज कधी ट्विट करतायत, याची सगळे जण वाट पहातायत.


अशी माहिती कळली आहे की लग्न सोहळ्याला शाहरुख खान, फराह खान आणि संजय लीला भन्साळी उपस्थित होते. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार या रिसाॅर्टमध्ये दोघं उतरलेत, त्याला 75 रुम्स आहेत. 4 रेस्तराँ आणि बार आहेत. शिवाय 4 कान्फरन्स रूम्स, एक स्पा, इनडोर स्विमिंग पूलही आहे.


एका रूमची किंमत 400 युरो म्हणजे भारतीय रुपयांप्रमाणे 33 हजार आहे. या हाॅटेलमध्ये दिवसभर राहायचं असेल तर 24 लाख 75 हजार रुपये मोजावे लागतील. तर पूर्ण आठवडाभरासाठी याची किंमत आहे 1 कोटी 73 लाख 25 हजार रुपये.



दीपिकानं मेहंदी आर्टिस्टसमोर ठेवल्या इतक्या अटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...