मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: 'बॉलिवूड याला सहन कसं करतं?' रणवीरचा नवीन लुक पाहून चाहते पुन्हा हैराण

VIDEO: 'बॉलिवूड याला सहन कसं करतं?' रणवीरचा नवीन लुक पाहून चाहते पुन्हा हैराण

अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा चित्रविचित्र फॅशनमध्ये दिसून आला आहे. पाहा त्याचा लुक.

अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा चित्रविचित्र फॅशनमध्ये दिसून आला आहे. पाहा त्याचा लुक.

अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा चित्रविचित्र फॅशनमध्ये दिसून आला आहे. पाहा त्याचा लुक.

  • Published by:  News Digital
मुंबई 24 जुलै : अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) कधी कोणती स्टाईल करेन याचा काहीच नेम नाही. आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असणारा रणवीर नेहमीच साऱ्यांच लक्ष वेधून घेतो. तर यावेळी पुन्हा तो आपल्या स्टाईल मध्ये दिसून आला. पण यावेळी त्याला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. हिरव्या रंगाचा ट्रॅक सूट त्यावर रंगीत गॉगल तर तोंडाला मास्क ऐवजी भला मोठा बांधलेला रुमाल आणि लांब केस असा त्याचा एकंदरीत अवतार होता. त्याचा हा अवतार पाहून सारेच थक्क झाले होते. दरम्यान रणवीर एअरपोर्ट वर स्पॉट झाला होता. यावेळी अनेक लोक तिथे उपस्थित होते.
View this post on Instagram

A post shared by Zoom TV (@zoomtv)

चाहत्यांना, प्रेक्षकांना चकित करण्याची रणवीरची ही पहिलच वेळ नाही अनेकदा तो अशा भन्नाट अवतारात दिसला आहे. पूर्ण आत्मविश्वासाने ती कोणताही आऊटफिट कॅरी करतो. पण रणवीरचा हा लुका पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.  (Ranveer singh funky style) याशिवाय रणवीर सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त होताना दिसत आहे. मागील वर्षाचे त्याचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत असले तरीही नव्या चित्रपटांची भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच रणवीर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ऑफिस बाहेर स्पॉट झाला होता. त्यामुळे भन्साळी आणि रणवीर आता कोणता मसाला चित्रपट घेऊन येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू; वाचा तपासाची Inside Story

रणवीर करण जोहरच्या आगामी चित्रपटातही झळकणार आहे. काही दिवांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ‘रॉकी ओर राणी की प्रेमकहाणी’ (Rocky Or Rani Ki Premkahani) असं या चित्रपटाचं नाव आहे तर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) रणवीर सोबत झळकणार आहे.
First published:

Tags: Bollywood actor, Deepika padukone, Entertainment, Ranveer sigh

पुढील बातम्या