काहीच दिवसांपूर्वी त्याने मोठे केस वाढवत गळ्यात सोन्याचे दागिने आणि हटके ट्रॅक सूट परिधान करत साऱ्यांचच लक्ष वेधलं होतं. त्यामुळे रणवीर नेहमीच चर्चेत राहतो. (Ranveer Singh style)View this post on Instagram
याशिवाय रणवीरकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. तर काही प्रदर्शनाच्या रांगेतही आहेत. सूर्यवंशी, 83, हे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान मागील वर्षीचा लॉकडाउन आणि यावर्षी देखील निर्बंध असल्याने अनेक चित्रपटांचं प्रदर्शन रखडलं आहे. यानंतर धर्मा प्रॉडक्शन्सचा चित्रपट ‘रॉकी और राणी की प्रेमकहाणी’ मध्ये रणवीर अभिनेत्री आलिया भट्ट सोबत दिसणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं शुटींग सुरू झालं आहे. याआधी ते 'गली बॉय' या चित्रपटात एकत्र दिसले होते. तसेच धर्मा प्रॉड्क्शन्सचा तख्त, जयेश भाई जोरदार, सर्कस या चित्रपटांमध्ये तो दिसणार आहे. याशिवाय अन्नीयन या साऊथ रिमेक मध्येही तो झळकणार आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.