मुंबई, 19 जुलै- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा 83 सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. ही ऐतिहासिक घटना दिग्दर्शक कबीर बेदी रुपेरी पडद्यावर आणणार आहे. सध्या 83 सिनेमाची संपूर्ण टीम क्रिकेट शिकण्याची प्रॅक्टीस करत आहे. नुकताच या सिनेमाच्या प्रॅक्टीसवेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये प्रत्येक कलाकार मैदानात प्रॅक्टीस करत असताना अचानक असं काही झालं की, सारे स्वतःचा सराव सोडून जोरजोरात हसायला लागले. त्याचं झालं असं की, क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आणि अभिनेता चिराग पाटीलने संदीप चिरागने बॅट तोडल्यानंतर सगळेच त्याच्या जवळ गेले आणि त्याला शाब्बासकी दिली.
चिरागने स्वतः हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ‘नेट प्रॅक्टीस गोल’ असं कॅप्शनही दिलं आहे. चिरागने बॅट तोडल्यावर अभिनेता साहिल खट्टर म्हणाला की, ‘फौलाद की औलाद.. संदीप पाटील यांच्या मुलाने चिराग पाटीलने सरावादरम्यान वडिलांचीच बॅट मोडली.’ एकंदरीत सरावादरम्यान प्रत्येकजण खूप एन्जॉय करताना दिसले.
भारतीय क्रिकेटर कपिल देव यांच्या आयुष्यावर 83 हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात रणवीर सिंग कपिल यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात कपिल यांच्या बायकोची भूमिका दीपिका पदुकोण साकारणार आहे. लग्नानंतर दोघांचाहा पहिला एकत्र सिनेमा असणार आहे. या दोघांशिवाय 83 सिनेमात एमी विर्क, हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहर भसीन आणि साहिल खट्टर या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी 10 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.