आमच्या लग्नाबाबत बातमी असेल तर मी जगाला ओरडून सांगेन- रणवीर सिंग

आमच्या लग्नाबाबत बातमी असेल तर मी जगाला ओरडून सांगेन- रणवीर सिंग

रणवीरच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडच्या या क्युट कपलच्या लग्नाच्या चर्चांना आता फुलस्टॉप लागलाय.

  • Share this:

10 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण आता रणवीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान त्याच्या लग्नाबाबत खुलासा केलाय. 'दीपिका आणि माझ्या लग्नाच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत. सध्या आम्ही दोघंही आमच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहोत. जर भविष्यात आमच्या लग्नाबाबत कोणती बातमी असेल तर मी जगाला ओरडून सांगेन,' असं रणवीरने सांगितलं.

काही दिवसांपूर्वी दोघांचं लग्न डिसेंबरात होणार, दोन्ही कुटुंबाची लग्नाची खरेदी सुरू झालीय अशा बऱ्याच चर्चांना सुरुवात झाली होती. अगदी हे लग्न डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत पोचलं होतं. रणवीरच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडच्या या क्युट कपलच्या लग्नाच्या चर्चांना आता फुलस्टॉप लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2018 12:54 PM IST

ताज्या बातम्या