S M L

#News18RisingIndia : दीपिकामुळे माणूस म्हणून मी मोठा झालो-रणवीर सिंग

न्यूज18 रायझिंग इंडियाच्या कार्यक्रमात रणवीरला दीपिका आणि त्याच्या नात्याबद्दल विचारलं गेलंच. त्यावर तो म्हणाला, 'या नात्याला मी एक कलाकार म्हणून एका उंचीवर नेऊन ठेवलंय.'

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2018 05:13 PM IST

#News18RisingIndia : दीपिकामुळे माणूस म्हणून मी मोठा झालो-रणवीर सिंग

19 मार्च : रणवीर म्हटलं की दीपिका पदुकोणचं नाव आलंच. त्यामुळे न्यूज18 रायझिंग इंडियाच्या कार्यक्रमात रणवीरला दीपिका आणि त्याच्या नात्याबद्दल विचारलं गेलंच. त्यावर तो म्हणाला, ' या नात्याला मी एक कलाकार म्हणून एका उंचीवर नेऊन ठेवलंय.'

रणवीर म्हणाला, 'दीपिकाकडून मी खूप काही शिकलोय. कलाकार म्हणून मी बरंच काही शिकतो. मी तिच्यामुळे माणूस म्हणून मोठा झालो. ती माझ्या आयुष्यात असणं माझ्यासाठी भाग्याचं आहे.'

दीपिकासोबतची माझी रिलेशनशिप खूप खास आहे. तिचं आयुष्यात असणंच माझ्यासाठी सर्वकाही आहे असं सांगत रणवीरनं आपल्या मनाचा कप्पा हळुवार मोकळा केला. रिलेशनशिप म्हणजे परस्परांचं प्रेम. या या संबंधांत अभिनयाच्या स्तरावर ती खूपच पुढे असून मी तिच्याकडून खूप काही शिकतो, दीपिका मात्र माझ्या अभिनयाचं कौतुक करत नाही असंही त्यानं सांगितलं.असो. दीपिकाचं नाव ऐकल्यावरच रणवीरच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून जातात. काही दिवसांपूर्वी दीपिकाचे आईवडील रणवीरच्या आईवडिलांना भेटायला आले होते. असं म्हणतात, या भेटीत दोघांच्या लग्नाबद्दल चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2018 05:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close