S M L

रणवीर सिंगच्या पाकिस्तानी सिनेमाची बाॅक्स आॅफिसवर घोडदौड

हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात त्याने 7 कोटी 20 लाखांचं कलेक्शन मिळवलंय.

Updated On: Jul 25, 2018 11:48 AM IST

रणवीर सिंगच्या पाकिस्तानी सिनेमाची बाॅक्स आॅफिसवर घोडदौड

मुंबई, 25 जुलै : रणवीर सिंग सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत असला तरीही अजून एका कारणामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत झालाय. यामागचं कारण आहे रणवीर सिंगचा नवा पाकिस्तानी सिनेमा. रणवीरने त्याचा मित्र अली जफरच्या 'तिफा इन ट्रबल' या पाकिस्तानी सिनेमात एक गेस्ट अपिअरन्स केलाय. हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसात त्याने 7 कोटी 20 लाखांचं कलेक्शन मिळवलंय. पाकिस्तानात एवढं चांगलं ओपनिंग मिळवणारा हा पहिलाच सिनेमा आहे.  भारतातला 'बाजीराव मस्तानी' पाकिस्तानातही हिट ठरल्याचीही चर्चा आहे.

अली जफरची सिनेमात मुख्य भूमिका आहे.  सिनेमा एका अली नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरतो. या अलीला टिक्काचं आऊटलेट सुरू करायचंय. सिनेमाच्या शेवटी रणवीर सिंग हा टिक्का खाताना सिनेमात दिसतो.

हेही वाचा

...म्हणून माझं रणबीरशी ब्रेकअप झालं होतं - दीपिका पदुकोण

अभिषेक बच्चन मीडियावर का भडकला?

Loading...

मान्यता दत्तनं संजूबाबाजवळ केला 'असा' प्रेमाचा इजहार!

अली जफर आणि रणवीरची मैत्री जुनी आहे. किल दिल सिनेमात दोघांनी भूमिका केली होती. म्हणूनच अलीनं या सिनेमात गेस्ट म्हणून रणवीरला विनंती केली. त्यानं लगेच होकार दिला. अलीसोबत माया अली हा नवा चेहरा आहे. तर आसन रहीनं सिनेमा दिग्दर्शित केलाय.

रणवीर सिंगच्या आगामी सिनेमांचीही खूप चर्चा आहे. सिम्बा, गली बाॅय आणि 1983च्या वर्ल्डकपवरचा सिनेमा. सिम्बामध्ये रणवीरसोबत सारा अली खान आहे. टेम्पर या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. रोहित शेट्टीनं दिग्दर्शन केलंय.

तर आलिया भट्टसोबतच्या गली बाॅयमध्ये रणवीर देशी राॅक स्टारच्या भूमिकेत आहे. झोया अख्तरचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा पुढच्या वर्षी फेब्रुवारीत रिलीज होईल. आणि वर्ल्डकपवरच्या सिनेमात तो कपिल देवच्या भूमिकेत आहे.

शिवाय त्याचं या वर्षी दीपिकासोबत लग्नही आहे. म्हणजे रणवीर कपूरची सर्व बोटं तुपात आहेत, एवढं खरं.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2018 11:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close