रणवीर सिंग 'हिच्या'साठी अक्षरश: टाकतो जीव

रणवीर सिंग 'हिच्या'साठी अक्षरश: टाकतो जीव

येत्या शुक्रवारी सिंबा रिलीज होतोय. रणवीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे.

  • Share this:

मुंबई, 24 डिसेंबर : येत्या शुक्रवारी सिंबा रिलीज होतोय. रणवीर सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. हल्ली प्रमोशनचे प्रकारही बदललेत. पूर्वी मीडियाच्या मदतीनंच जास्त प्रमोशन्स व्हायची. अजूनही होतात. पण आता तेवढंच मर्यादित राहिलेलं नाहीय. हल्ली थेट प्रेक्षकही कलाकारांशी संपर्क साधू शकतात.

याच सिनेमाच्या ऑनलाईन प्रमोशनसाठी आस्क सिंबा ( #asksimba ) असा हॅशटॅग वायरल करण्यात आलाय. याद्वारे ठराविक वेळेत तुम्ही रणवीरला कोणताही प्रश्न विचारू शकता. नुकतंच एका पत्रकाराने तुला दिल्लीचा ब्रेड पकोडा आवडतो की मुंबईतले पोहे असं विचारलं. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता रणवीरने घरच्या घरी बनलेली सिंधी करी असं उत्तर दिलंय. या सिंधी करीसाठी तो अक्षरश: जीव टाकतो.

सिंबाची टीम आज ( 24 डिसेंबर ) चला हवा येऊ द्यामध्ये दिसणार आहे.आता हे कलाकार थुकरट वाडीत सज्ज होणार म्हटल्यावर विनोदवीरांनीदेखील धमाल केली. थुकरटवाडीत चेन्नई एक्सप्रेस आणि सिंघम या चित्रपटांवर आधारित विनोदी स्किट सादर करण्यात आलं. या धमाकेदार स्किटने सर्व कलाकारांना पोट धरून हसायला लावलं.

इतकंच नव्हे तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना त्यांचं हे स्किट इतकं आवडलं की रोहितने सगळ्यांचं तोंडभरून कौतुक तर केलंच पण त्याच सोबत त्याने निलेशकडे या स्किटचे राईट्स मागितले. त्या स्किटवर चित्रपट बनवायला आवडेल असंही म्हणाला.

सिंबाच्या प्रमोशन दरम्यान दिग्दर्शक रोहित शेट्टीनं एक गुपित उलगडलं आहे. ते म्हणाला, मला असा एक सिनेमा बनवायचाय, ज्यात सिंघम आणि सिंबा एकत्र असतील. आतापर्यंतच्या हिंदी सिनेमात असं झालेलं नाही. पण आता ते करण्याचा माझा प्रयत्न आहे.'

रोहित म्हणाला, 'प्रेक्षकांना सिंघम आवडलाय. त्या दोन व्यक्तिरेखांना एकत्र आणलं तर धमाका होईल.' रोहित सिंबा 2वरही काम सुरू करणार आहे.


मधुरा-विक्रम आणि नील-भैरवी नव वर्षाचं करतायत रोमँटिक स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 05:09 PM IST

ताज्या बातम्या